'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेत रूपालीला कळतं की इंद्राणीला नेत्राच्या मनातलं ऐकू येत नाही. त्यामुळे रूपालीचा संताप होतो. आणि ती इंद्राणीला घर सोडून जायला सांगते. इंद्राणी घर सोडून जात असताना ममताचा आत्मा येऊन तिला रोखतो. ममता इंद्राणीला जाऊ नको, असं सांगते. इंद्राणीला याचं आश्चर्य वाटतं. नेत्रा विचार करते की ममताने नेमकं काय इंद्राणीला सांगितलं असेल.
नेत्रा या विचारात असताना अव्दैत तिला आपल्यासोबत घेऊन जातो. दुसरीकडे रागावलेल्या रूपालीला शांत करण्यासाठी इंद्राणी तिला त्रिनयना देवीच्या प्रकटदिनाविषयी सांगते. प्रकटदिनादिवशी हळद-कुंकू ओलांडलं गेलं तर देवीची अवकृपा होईल आणि त्याचा नेत्राला त्रास होईल, कदाचित नेत्राची दिव्यशक्ती, तिला संकेत दिसणं, हे सगळं कायमचं बंद होईल. असं इंद्राणी रूपालीला सांगते.
त्रिनयना देवीच्या प्रकटदिनादिवशी नेमकं काय घडणार, रूपाली आणि इंद्राणी मिळून कसा डाव साधणार, आणि नेत्रा हळदी-कुंकू ओलांडणार का... हे लवकरच सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत पहायला मिळणार आहे.