Join us

'चंद्रशेखर'च्या वडिलांच्या भूमिकेत सत्यजित शर्मा झळकणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2018 6:08 AM

'बालिका वधू' या लोकप्रिय मालिकेत सत्यजित शर्मा बसंत  या भूमिकेत झळकला होता. त्याची भूमिका  रसिकांच्या पसंतीस पात्र टरली होती.बाल ...

'बालिका वधू' या लोकप्रिय मालिकेत सत्यजित शर्मा बसंत  या भूमिकेत झळकला होता. त्याची भूमिका  रसिकांच्या पसंतीस पात्र टरली होती.बाल विवाह यावर 'बालिका वधू' मालिकेने भाष्य केले होते.या मालिकेतील सगळेच भूमिका गाजल्या.त्यात बसंतची ही भूमिकाही रसिकांनी पसंत केली होती.आता सत्यजित शर्मा पुन्हा एका वेगळ्या भूमिकेत रसिकांच्या भेटीला येणार आहे.भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या जिवाचे बलिदान देणा-या निधड्या छातीचा स्वातंत्र्यसैनिक 'चंद्रशेखर' यांच्या जीवनावर आधारित वैशिष्ट्यपूर्ण मालिका रसिकांच्या भेटीला येणार आहे.या मालिकेत सत्यजित शर्मासह स्नेहा वाघ आणि अयान झुबेर रेहमानी हे कलाकारही वैशिष्ट्यपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. आहे.या मालिकेत आता सत्यजित शर्मा अभिनेता चंद्रशेखरचे वडील सीताराम तिवारी यांच्या भूमिकेत दिसणार आहे.यापूर्वी 'एक दूजे के वास्ते' आणि 'बालिका वधूट या मालिकांतील भूमिकांमुळे सत्यजितने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.यात तो एका धर्मपरायण आणि आदर्श मूल्यवादी पित्याची भूमिका साकारणार आहे.सत्यजित शर्माने या मालिकेबद्दलचा आपला अनुभव सांगितला, “ही मालिका उत्तमच आहे आणि माझ्या मते तिला प्रेक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद त्याहीपेक्षा उत्तम असेल.ही मालिका शक्य तितकी वास्तव आणि अचूक व्हावी,यासाठी तिच्याशी निगडित प्रत्येकजण खूपच मेहनत घेत आहे.”तसेच स्नेहा वाघनेही 'ज्योती','एक वीर की अरदस- वीरा' आणि 'शेर-ए- पंजाब :महाराजा रणजितसिंग'च्या माताची भूमिका पार पडल्यानंतर स्नेहा वाघ आता पुन्हा एकदा आईच्या भूमिकेत दिसणार आहे.‘चंद्रशेखर’या आगामी भव्य आणि महत्त्वपूर्ण मालिकेत ती 'चंद्रशेखर' यांची माता जगरानी तिवारी यांची भूमिका उभी साकारणार आहे. चंद्रशेखर नावाच्या केवळ आठ वर्षांच्या एक अतिशय शूर आणि निर्भय मुलाची कथा या मालिकेत सांगण्यात आली आहे.चंद्रशेखरमध्ये ही निर्भयतेची आणि शौर्याची भावना निर्माण करणार्‍या आईच्या भूमिकेत स्नेहा वाघ दिसेल.स्नेहा वाघ म्हणाली,“चंद्रशेखरचं जीवनात एकाच व्यक्तीवर प्रेम असतं- ते म्हणजे त्याची आई. मी जगरानी तिवारी या त्याच्या आईच्या भूमिकेत असेन. या मालिकेचा आतापर्यंतचा अनुभव हा फारच अदभुत आहे.तो काळ वीज नव्हती तेव्हाचा आहे.तेव्हा समाजावर अंधश्रध्देचा पूर्ण पगडा होता आणि समाजात महिलांना काही किंमत नव्हती.त्या पुरुषांच्या दासी होत्या. त्याची पटकथा ही वास्तव आहे.अशा घडामोडींवर ही मालिका प्रकाशझोत टाकते.