व्हॅक्सिन सुरु झाल्यापासून पुरेसा पुरवठा नसल्यामुळे सगळ्यानाच व्हॅक्सिन मिळत नाही. सर्वसामान्य गेल्या काही दिवसांपासून व्हॅक्सिन रजिस्ट्रेशन केल्यानंतर स्लॉट कधी मिळणार याकडेच लक्ष लावून बसले असताना सेलिब्रेटी मात्र बनावट ओळखपत्राद्वारे व्हॅक्सिन घेत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. बॉलिवूड अभिनेत्री मीरा चोप्रानेही बनावट ओळखपत्राद्वारे व्हॅक्सिन घेतल्याचे समोर आले होते. आता त्याचपाठोपाठ भाभीजी घर पर है फेम अभिनेत्री सौम्या टंडनेदेखील अशाच प्रकारे व्हॅक्सिन घेतल्याची माहिती समोर येत आहे.
सौम्या टंडनचा फोटो असलेलं एक ओळखपत्र समोर आलं आहे.फ्रंटलाइन वर्कर असल्याचं सांगत ठाण्यातील एका रुग्णालयातून कोरोना लसीकरण केल्याचा आरोप सध्या सौम्या टंडनवर केला जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे ओळखपत्रावर सौम्या ही फ्रंट लाइन वर्कर असल्याचं नमूद करण्यात आले आहे.
यावर सौम्यानेदखील स्पष्टीकरण दिले आहे. समोर आलेली माहिती चुकीची असल्याचे तिने म्हटले आहे. मी ठाण्यातून लस घेतलीच नाही असे तिने म्हटले आहे. बनावट ओळखपत्राद्वारे लस घेतल्याचा आरोप निराधार असल्याचंही तिने स्पष्ट केले आहे.या संदर्भातील एक ट्विटही तिने केले आहे.
मालिका यशाच्या शिखरावर असताना भीभीजी घर पर है ही मालिका तिने सोडली. मालिकेत तिची भूमिका आता नेहा पेंडसे साकरात आहे.साचेबद्ध कामात अडकून न राहता वेगळे काही तरी करण्याची तिची इच्छा आहे. म्हणूनच लोकप्रिय भूमिका आणि तितकीच लोकप्रिय मालिका सोडल्यानंतर तिच्या खासगी आयुष्य सध्या एन्जॉय करत आहे.