Join us

'सावळ्याची जणू सावली'मधील सावलीचं अनोखं रुप, महाशिवरात्रीनिमित्त शूट केला खास व्हिडीओ

By तेजल गावडे | Updated: February 25, 2025 14:53 IST

Savalyanchi Janu Savali Fame Savali Aka Prapti Redkar :नुकतेच प्राप्तीने महाशिवरात्रीनिमित्त एक स्पेशल व्हिडीओ शूट केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

'सावळ्याची जणू सावली' (Savalyachi Janu Savali) मालिकेला अल्पावधीत प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं. या मालिकेतील सावलीने रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. तिचा सोज्वळ, साधेपणा आणि प्रेमळ स्वभाव सर्वांना भावला. या मालिकेत सावलीची भूमिका अभिनेत्री प्राप्ती रेडकर (Prapti Redkar) हिने निभावली आहे. या भूमिकेतून तिला चांगलीच लोकप्रियता मिळताना दिसते आहे. प्राप्ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय आहे आणि ती बऱ्याचदा फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. नुकतेच प्राप्तीने महाशिवरात्रीनिमित्त एक स्पेशल व्हिडीओ शूट केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

अभिनेत्री प्राप्ती रेडकर हिने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. तिने हा महाशिवरात्री निमित्त व्हिडीओ शूट केला आहे. यात तिने गोल्डन बॉर्डर असलेली पांढऱ्या रंगाची साडी नेसली आहे. नाकात नथ घातली आहे. तसेच तिने कपाळी भस्म लावलं आहे आणि हातात रुद्राक्षची माळ असून जप करताना दिसत आहे. या व्हिडीओत तिचे अनोखे लूक पाहायला मिळत आहे. 

प्राप्ती रेडकरच्या या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. चाहते व्हिडीओवर कमेंट्स करताना दिसत आहे. मेघा धाडेने कमेंटमध्ये लिहिले की, हर हर महादेव. अभिनेता गुरू दिवेकरने फायर इमोजी शेअर करत लिहिले की, प्राप्ती हा कमाल झालाय.एका युजरने लिहिले की, हर हर महादेव. सुंदर, अतिसुंदर, नितांत सुंदर. दुसऱ्या युजरने म्हटले की, एक नंबर सावली. क्या बात है.. फुल पार्वती झालीस. खूपच छान.

वर्कफ्रंटअभिनेत्री प्राप्ती रेडकर हिने किती सांगायचंय मला या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर तिने काव्यांजली मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. त्यानंतर सोनी वाहिनीवरील ‘मेरे साई’ या हिंदी मालिकेतही ती झळकली होती. सध्या ती 'सावळ्याची जणू सावली' या मालिकेत काम करताना दिसते आहे.