Join us  

सवत माझी लाडकी...! 'तू चाल पुढं' फेम अभिनेत्री असं का म्हणाली?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 11:56 AM

Tu chaal Pudha : लोकप्रिय मालिका 'तू चाल पुढं' ऑगस्ट २०२२मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आली. नुकतीच या मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'तू चाल पुढं' (Tu Chaal Pudha) ऑगस्ट २०२२मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आली. दीपा परब-चौधरी, आदित्य वैद्य, धनश्री काडगांवकर, प्रतिभा गोरेगावकर, देवेंद्र दोडके, परी तेलंग अशी जबरदस्त कलाकार मंडळी असलेली ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. नुकतेच या मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. तू चाल पुढं मालिकेचा शेवट गोड झाला आहे. मात्र प्रेक्षक आजही मालिकेला आणि त्यातील कलाकारांना मिस करत आहेत. दरम्यान आता अभिनेत्री परी तेलंग (Pari Telang) हिने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. तिची ही पोस्ट चर्चेत आली आहे.

अभिनेत्री परी तेलंग हिने तू चाल पुढं मालिकेत मीराची भूमिका साकारली आहे. तिची ही ग्रे शेड भूमिका होती. दरम्यान आता तिने इंस्टाग्रामवर अश्विनी म्हणजेच दीपा परब हिच्यासोबतचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोसोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, सवत माझी लाडकी २०२३-२४. मीरा - अश्विनी. दीपाचे शेवटच्या फोटोतून एक्स्प्रेशन पाहा. अगं मला गोळी मारुन हसतेस काय?

परी तेलंगच्या या पोस्टला चाहत्यांची पसंती मिळत आहे. ते या पोस्टवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करताना दिसत आहेत. १३ जानेवारीला मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित करण्यात आला. दरम्यान आता झी मराठी वाहिनीवर तीन नवीन मालिका भेटीला येत आहेत. यात पारू, शिवा, जगद्धात्री या मालिकांचा समावेश आहे. याशिवाय ‘ड्रामा Juniors’ हा नवा रिअ‍ॅलिटी शो देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.