'सावळ्यांची जणू सावली'तील सावली थिरकली 'सामी..' गाण्यावर, मराठमोळ्या श्रीवल्लीच्या डान्सला मिळतेय पसंती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2024 10:18 AM2024-12-09T10:18:52+5:302024-12-09T10:19:35+5:30
Prapti Redkar : अभिनेत्री प्राप्ती रेडकर हिने नुकताच इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात ती रिल स्टार तन्मय पाटेकर सोबत 'पुष्पा २'मधील हिट गाणं सामीवर थिरकताना दिसते आहे.
झी मराठी वाहिनीवरील 'सावळ्याची जणू सावली' (Savalyachi Janu Sawali) मालिकेनं कमी कालावधीत रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. या मालिकेतील सावलीने आपल्या सोज्वळ, साधेपणा आणि प्रेमळ स्वभावाने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. मालिकेत अभिनेत्री प्राप्ती रेडकर (Prapti Redkar) सावलीची भूमिका साकारली आहे. तिला सावलीच्या भूमिकेतून चांगलीच लोकप्रियता मिळत आहे. दरम्यान प्राप्ती रेडकर खऱ्या आयुष्यात सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे आणि नुकताच तिने पुष्पा २ सिनेमातील 'सामी..' गाण्यावर डान्स केला असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिच्या या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
अभिनेत्री प्राप्ती रेडकर हिने नुकताच इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात ती रिल स्टार तन्मय पाटेकर सोबत 'पुष्पा २'मधील हिट गाणं सामीवर थिरकताना दिसते आहे. त्यात त्या दोघांनी पुष्पाराज आणि श्रीवल्लीसारखा लूक केला आहे. त्यांच्या या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. या व्हिडीओवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
सावळ्याची जणू सावली मालिकेबद्दल
सावळ्याची जणू सावली मालिकेची कथा सावलीभोवती फिरते. तिला गायनाची प्रचंड आवड आहे. तिचे बाबा तिला लहानपणापासून म्हणायचे की सावलीच गाणं म्हणजे १०० नंबरी सोनं. ती खूप समंजस आणि समजूतदार आहे, कमी वयात तिच्यावर जबाबदाऱ्या आल्यामुळे सगळ्यांना सांभाळून घेण्याचं तिचं व्यक्तिमत्व आहे. आता तिचे सारंगसोबत लग्न झालंय आणि लग्नानंतर सावलीचे पूर्ण विश्वच बदलले आहे. आता भैरवीसोबत तिला तिलोत्तमाचा ही सामना करायचा आहे.