Join us

'आई लाइक इट' Bhabiji Ghar Par Hain मालिकेसाठी 'सक्सेना जी'ला मिळणारे मानधन जाणून व्हाल आवाक्

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2022 12:49 PM

सानंद वर्माला ((Saanand Verma) खरी ओळख मिळवून दिली ती 'भाबीजी घर पर हैं' या मालिकेनेच.सानंद वर्मा आज त्याच्या खर्‍या नावाने कमी ''सक्सेना जी'' या भूमिकेच्या नावानेच तो जास्त ओळखला जातो.

'भाभीजी घर पर है' (Bhabiji Ghar Par Hain)ही विनोदी मालिका असून विभूती, अंगूरी भाभी आणि मिश्राजी या भूमिका रसिकांच्या आवडत्या व्यक्तिरेखा आहेत.भाभीजी घर पर है या मालिकेला रसिकांची भरघोस पसंती मिळते म्हणूनच रसिकांची आवडती मालिकांपैकी एक ही मालिका आहे. मालिकेतले सगळ्याच कलाकारांच्या भूमिका रसिकांच्या आवडीच्या आहे. या सगळ्यात सक्सेना जी ही भूमिकाही तितकीच लोकप्रिय आहे. गालावर एक चपराक बसल्यावर  किंवा विजेचा धक्का लागल्यावर जेव्हा तो ''आई लाइक इट' म्हणतो तेव्हा प्रेक्षकही खूप एन्जॉय करतात. त्याचा हा संवाद आज सर्वांच्याच लक्षात आहे.

अभिनेता सानंद वर्माने ((Saanand Verma) ही भूमिका आपल्या वेगळ्याच अंदाजात साकारत रसिकांची पसंती मिळवली आहे.ही भूमिका साकारण्यासाठी अभिनेत्याला भली मोठी रक्कम मिळते.सानंद २०१५ पासून या मालिकेत काम करत आहे.मीडिया रिपोर्ट्सनुसार सानंद या मालिकेच्या एका एपिसोडसाठी जवळपास 15 से 20 हजार रुपए इतके मानधन घेतो. इतकं मानधन घेऊनही तो त्याचं जीवन सरळ साध्या मार्गाने जगतो. त्याच्या वागण्या, बोलण्यात कुठलाही बडेजावपणा जाणवत नाही. प्रत्येक कामात एव्हरेडी असणारा सळसळता उत्साह, जोष, जल्लोष आणि मेहनत हेच सानंदच्या यशाचे खरं कारण आहे. 

छोट्या पडद्यावर सानंद लोकप्रिय तर आहेच पण रुपेरी पडद्यावरही त्याने आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. अजय देवगनचा 'रेड', सुशांत सिंह राजपूतचा 'छिछोरे', रानी मुखर्जीचा 'मर्दानी' आणि 'पटाखा' सिनेमातही तो झळकला आहे. पण सानंद वर्माला खरी ओळख मिळवून दिली ती 'भाबीजी घर पर हैं' या मालिकेनेच.सानंद वर्मा आज त्याच्या खर्‍या नावाने कमी ''सक्सेना जी'' या भूमिकेच्या नावानेच तो जास्त ओळखला जातो.

सानंद वर्मा यांना आज जिथे आहे तिथे पोहोचण्यासाठी त्याला खूप संघर्ष करावा लागला. वयाच्या ८ व्या वर्षीच त्याने काम करायला सुरुवात केली. तो वडिलांना घर चालवायला आणि पुस्तके विकायला मदत करत असे. इतकंच काय तर घराचा घरखर्च चालवण्यासाठी वयाच्या १२व्या वर्षी ट्युशन घ्यायला सुरुवात केली होती. त्यावेळी त्याला फक्त 15 रुपये इतकंच फी स्वरुपात मिळायची. पण आज यश तो प्रचंड यशस्वी आहे. आज त्याच्याकडे पैसा, प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा सगळंकाही आहे.