Join us

नाकात नथ, चेह-यावर बाशिंग नववूधूच्या रुपात दिसली फारच सुंदर, फोटो पाहून चर्चेला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2021 10:51 AM

या फोटोंमध्ये सायलीचा लूक कुणालाही घायाळ करेल असाच आहे. नववधूप्रमाणे नटलेल्या आणि साजश्रृंगार केलेल्या सायलीचा हा लूक रसिकांनाही तितकाच भावतो आहे.

मराठमोळी अभिनेत्री आणि रसिकांची लाडकी म्हणजेच सायली संजीव. विविध भूमिका साकारत सायलीने रसिकांची मनं जिंकली आहेत. सायलीदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून रसिकांशी संवाद साधत असते. यानिमित्ताने आपल्या लाडक्या अभिनेत्रीशी मनमोकळ्या गप्पा मारण्याची संधी रसिकांना मिळते. मात्र सोशल मीडियावरील सायलीचे काही फोटो पाहून रसिकांमध्ये वेगळीच कुजबू सुरु झाली आहे. 

या फोटोंमध्ये सायलीचा लूक कुणालाही घायाळ करेल असाच आहे. नववधूप्रमाणे नटलेल्या आणि साजश्रृंगार केलेल्या सायलीचा हा लूक रसिकांनाही तितकाच भावतो आहे. यांत तिचे सौंदर्यं आणखीनच खुलून गेले आहे. सायलीचा हा नववधू किंवा ब्रायडल लूक पाहून रसिकांध्ये तिच्या लग्नाची कुजबूज सुरु झाली.

लाडक्या सायलीचा लूक तर लय भारी मात्र ती लग्न करणार की काय अशा शक्यतेने रसिकांचा विशेषतः तरुणांचा हिरमोड झाला आहे. सध्या सगळीकडे लग्नाचा मौसम सुरु आहे. सर्वसामान्यांसह सेलिब्रिटीमंडळीसुद्धा रेशीमगाठीत अडकत आहेत. त्यामुळेच आता सायलीलाही लग्नाचे वेध लागले आहेत की काय अशा कमेंटस तिच्या या फोटोवर पाहायला मिळत आहेत. 

शुभ मंगल ऑनलाइन ही सायलीची मालिका सध्या चांगलीच गाजत आहे. या मालिकेतील तिची शर्वरीची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेत तिची जोडी सुयश टिळकसोबत जमली आहे.याच मालिकेत तिच्या लग्नाचा खास भागा पाहायला मिळणार आहे. मालिकेत होणा-या लग्नातला सायलीचा हा खास लूक आहे. शूट दरम्यानचा हे फोटो आहेत.  

छोट्या पडद्यावरील 'काहे दिया परदेस' ही मालिका रसिकांना चांगलीच भावली होती. बनारसचा छोरा शिव आणि मराठमोळी गौरी यांची प्रेमकथा रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली होती. शिवची भूमिका साकारणारा ऋषी सक्सेना आणि गौरीची भूमिका साकारणारी सायली संजीव यांनी रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं होतं.

मालिकेतील मराठमोळी गौरी अर्थात अभिनेत्री सायली संजीव रसिकांच्या मनात घर करून गेली. तिचं वागणं, बोलणं आणि तिच्या भूमिकेतला साधेपणा रसिकांना विशेष भावला. या मालिकेनंतर सायली म्हणजेच गौरी अशी प्रतिमा रसिकांच्या मनात निर्माण झाली होती.

 लॉकडाऊन दरम्यान अनेकांना कठीण समस्येचा सामना करावा लागला मात्र सकारात्कदृष्टीने पाहिल्यास याच काळाने आयुष्यातली सगळ्यात महत्वाची गोष्टीची जाणीव करुन दिली. कदाचित सगळेच विसरलो होतो. आपली जवळची माणसं जरी असतील तरी कोणाला गृहीत धरता काम नये. आपले आई वडील, बहीण भाऊ, मित्रमंडळी यांना आपण गृहीत धरतो आणि वेळ देत नाही. आपण यांच्यासाठी वेळ काढला पाहिजे हि गोष्ट मला या लॉकडाउनमध्ये प्रकर्षाने जाणवल्याचे एका मुलाखतीत सायलीने सांगितले होते.

टॅग्स :सायली संजीव