Join us

मेकअपशिवाय देखील सायली संजीव दिसते तितकीच सुंदर, पाहा हा फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2021 12:40 PM

मेकअपशिवाय देखील सायली खूपच छान दिसते असे तिचे चाहते कमेंटद्वारे सांगत आहेत. तसेच नेटिझन्स तिच्या फिगरचे कौतुक करत आहेत. 

ठळक मुद्देसायलीचा एक फोटो तिने नुकताच सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिने वर्कआऊट नंतरचा तिचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत सायली मेकअपशिवाय दिसत आहे.

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री सायली संजीव सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी संवाद साधत असते. तसेच ती सोशल मीडियावर तिचे विविध फोटो, व्हिडिओ शेअर करत असते. सायलीला सोशल मीडियावर चांगलेच फॅन फॉलोव्हिंग असून तिच्या फोटोंचे तिचे चाहते नेहमीच कौतुक करतात. सायलीचा एक फोटो तिने नुकताच सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिने वर्कआऊट नंतरचा तिचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत सायली मेकअपशिवाय दिसत आहे. मेकअपशिवाय देखील सायली खूपच छान दिसते असे तिचे चाहते कमेंटद्वारे सांगत आहेत. तसेच नेटिझन्स तिच्या फिगरचे कौतुक करत आहेत. 

सायलीने हा फोटो शेअर केल्यानंतर काहीच तासांत हा फोटो व्हायरल झाला आहे. केवळ १७ तासांत ७२ हजाराहून अधिक लोकांनी ही पोस्ट लाईक केली आहे तर अनेकांनी या फोटोवर कमेंट केले आहे. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.  

छोट्या पडद्यावरील 'काहे दिया परदेस' ही मालिका रसिकांना चांगलीच भावली होती. बनारसचा छोरा शिव आणि मराठमोळी गौरी यांची प्रेमकथा रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली होती. शिवची भूमिका साकारणारा ऋषी सक्सेना आणि गौरीची भूमिका साकारणारी सायली संजीव यांनी रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं होतं. मालिकेतील मराठमोळी गौरी अर्थात अभिनेत्री सायली संजीव रसिकांच्या मनात घर करून गेली. तिचं वागणं, बोलणं आणि तिच्या भूमिकेतला साधेपणा रसिकांना विशेष भावला. या मालिकेनंतर सायली म्हणजेच गौरी अशी प्रतिमा रसिकांच्या मनात निर्माण झाली होती.

शुभ मंगल ऑनलाइन ही सायलीची मालिका सध्या चांगलीच गाजत आहे. या मालिकेतील तिची शर्वरीची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेत तिची जोडी सुयश टिळकसोबत जमली आहे. 

टॅग्स :सायली संजीव