Join us

सयंतनी घोषचा फिटनेस फंडा, नित्यनियमाने करते योगा आणि बरंच काही

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 7:58 PM

नियमित योगा करण्याबद्दल सयंतनी घोष सांगते,नुसते शारीरिक स्वास्थ्य असून चालत नाही तर त्या बरोबर मानसिक आणि भावनिक स्वास्थ्य राहिलं पाहिजे.

सयंतनी घोषने आरोग्‍यदायी जीवनशैली जगण्यावर अधिक भर देते म्हणूनच  ती दिवसाची सुरुवात योगा ने करते. नियमित योगा करण्याबद्दल सयंतनी सांगते,नुसते शारीरिक स्वास्थ्य असून चालत नाही तर त्या बरोबर मानसिक आणि भावनिक स्वास्थ्य राहिलं पाहिजे. रोज आपल्या मनात आणि शरीरात साठून राहणाऱ्या ताण तणावांचा निचरा करायचा असेल तर त्यासाठी योगाचा काही मिनिटांचा दैनंदिन सराव पुरेसा असतो. योगासने, प्राणायाम आणि ध्यान धारणा ही सर्व ताण तणाव नाहीशी करणारी प्रभावी तंत्रे आहेत. 

सयंतनी तिच्‍या दैनंदिन फिटनेस नित्‍यक्रमाबाबत सांगताना म्‍हणाली, ''माझ्या मते, फिटनेस अत्‍यंत महत्त्वाचा आहे आणि यामध्‍ये अनेक घटक असतात. शरीर आरोग्‍यदायी व तंदुरूस्‍त राहणे, त्‍वचा कोमल राहणे आणि प्रसन्‍नचित्त मनासह पोटाचे आरोग्‍य चांगले राहणे हे सर्व फिटनेसचे आवश्‍यक पैलू आहेत.माझ्या मते सोपे व मूलभूत फिटनेस नित्‍यक्रम शरीर आरोग्यदायी ठेवण्‍यासाठी पुरेसे आहे.

 

दीर्घकाळापर्यंत शूटिंग केल्‍यानंतर मी वेळात वेळ काढून व्‍यायाम करते, यामुळे मला ऊर्जा मिळते. सध्‍या जीम सुरू नाही आणि मी बाहेर शूटिंगमध्‍ये व्‍यस्‍त आहे. मी धावायला किंवा चालायला जात स्‍वत:ला तंदुरूस्‍त ठेवते आणि सर्वात महत्त्वाचे म्‍हणजे आरोग्‍यदायी आहाराचे सेवन करते. 

माझ्या मते, घरी बनवलेले पौष्टिक जेवण खाणे आरोग्‍य उत्तम ठेवण्‍यासाठी आवश्‍यक आहे. मी माझ्या व्‍यायाम नित्‍यक्रमाचा भाग म्‍हणून काहीसे वेट ट्रेनिंग व कार्डियो करते. मला नृत्‍य करायला आवडते. कधी-कधी मी झुंबा करत घाम गाळते. सध्‍याच्‍या आव्‍हानात्‍मक काळामध्‍ये प्रत्‍येकाने घरामध्‍येच चालत किंवा शारीरिक हालचाल करत आणि २० मिनिटांपर्यंत व्‍यायाम करत स्‍वत:ला तंदुरूस्‍त ठेवण्‍याचा प्रयत्‍न केला पाहिजे.''

ती पुढे म्‍हणाली, ''मी चॉकलेट खाल्‍ल्‍याशिवाय राहू शकत नाही. माझी गोड पदार्थांप्रती आवड पूर्ण करण्‍याचा सर्वोत्तम मार्ग म्‍हणजे मी चॉकलेटचा स्‍वाद असलेले प्रोटीन बार्स खाते. फिटनेसच्‍या बाबतीत मी अधिक प्रमाणात ट्रेनिंग न घेता मूलभूत शिस्‍तबद्ध नित्‍यक्रमाचे पालन करते, कारण यामुळे तंदुरूस्‍त राहण्‍यामध्‍ये मदत होते.''