Join us

सवंत सिंग प्रेमी सांगतोय, झायद खान आहे चांगला सहकलाकार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2017 11:01 AM

सोनी वाहिनीवर हासिल ही मालिका काहीच दिवसांपूर्वी सुरू झाली आहे. या मालिकेची कथा, या मालिकेतील व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडत ...

सोनी वाहिनीवर हासिल ही मालिका काहीच दिवसांपूर्वी सुरू झाली आहे. या मालिकेची कथा, या मालिकेतील व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. या मालिकेत वत्सल सेठ, झायद खान आणि निकिता दत्ता मुख्य भूमिकेत आहेत. या मालिकेतील सगळ्याच कलाकारांचे प्रेक्षक कौतुक करत आहेत. या मालिकेत सवंत सिंग प्रेमी गौरव रायचंदची भूमिका साकारत आहे. सवंतची भूमिका देखील प्रेक्षकांना खूपच आवडत आहे. ही मालिका सुरू होऊन काही महिने झाले असल्याने या मालिकेची टीम ही आता एका कुटुंबासारखी झाली आहे. या मालिकेतील सगळेच कलाकार चित्रीकरणाच्या दरम्यान मिळालेल्या वेळात मजा-मस्ती करताना दिसतात. सवंत सिंग प्रेमी हासिल या मालिकेत रणवीर म्हणजेच झायद खान आणि कबीर म्हणजेच वत्सल सेठचा भाऊ असल्याचे दाखवण्यात आले आहे. या मालिकेत काम करत असताना झायद एक सहकलाकार म्हणून किती चांगला आहे याची जाणीव सवंतला होत आहे. सवंत सध्या झायदचे प्रचंड कौतुक करत असल्याचे पाहायला मिळत आहे. याविषयी सवंत सांगतो, ''कोणत्याही मालिकेत अथवा चित्रपटात काम करत असताना तुम्हाला पाठिंबा देणारा, अगदी मनापासून तुमच्या सोबत असणारा सहकलाकार मिळणं, हे खरंच भाग्यशाली असतं. आमची अगदी पहिल्या दिवसापासूनच गट्टी जमली आणि आम्ही पहिल्या भेटीत बराच वेळ आमच्या आधीच्या कामाबद्दल बोलत होतो. त्याच्यासोबत काम करताना रोजचा दिवस कॅमेर्‍यासमोर आणि कॅमेर्‍यामागेही बरंच काही शिकवणारा असतो.'' हासिल या मालिकेविषयी सवंत सांगतो, ''हासिल हा माझ्यासाठी खूप काही शिकवणारा अनुभव आहे. ही ठराविक भागांची मालिका असल्याने काम सुरू होण्याआधीच बरंच प्लॅनिंग आणि तयारी झाली आहे. त्यामुळे काम करताना त्याची फारच मदत झाली. मी हॉलिवूड शॉर्ट सिरिजचा चाहता आहे. भारतातही अशा सिरिजचा मी भाग होऊ शकलो, याचा मला आनंद आहे.''गेली ४ वर्षं मनोरंजनाच्या दुनियेत असलेला सवंत नेहमीच झगमगाटापासून दूर राहिला आहे. त्याने झी टीव्हीच्या 'जमाई राजा', चॅनल व्हीच्या 'क्रेझी स्टुपिड इश्क' आणि 'लव्हशुदा' या २००६ साली प्रदर्शित झालेल्या सिनेमात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.Also Read : हासिल या मालिकेच्या सेटवर वत्सल सेठ बनला चायवाला