Join us

SEE PHOTO: 'रंगून' सिनेमातील कलाकारांची 'इंडियन आयडल'शोमध्ये हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2017 8:55 AM

'इंडियन ऑयडल'च्या मंचावर रंगून सिनेमाचे दणक्यात प्रमोशन करण्यात आले. यावेळी शाहिद कंपूर आणि बॉलिवूडची क्वीन कंगना रानौत आणि नवाब ...

'इंडियन ऑयडल'च्या मंचावर रंगून सिनेमाचे दणक्यात प्रमोशन करण्यात आले. यावेळी शाहिद कंपूर आणि बॉलिवूडची क्वीन कंगना रानौत आणि नवाब सैफअली खआन यांनी तिघांनी हटके स्टाइलने या मंचावर हजेरी लावताच स्पर्धकांचा उत्साहही द्विगुणीत झाला होता. विशेष म्हणजे या मंचावर फक्त सिनेमाच्या कलाकरांची उपस्थिती नव्हती तर गायक दिग्दर्शक, निर्माता आणि संगीतकार विशाल भारद्वाज यांनी त्यांची पत्नी रेखा भारद्वाजसह लावेलेल्या उपस्थितीने या शोमध्ये रंगत आणली.यावेळी रेखा भारद्वाज यांनाही स्पर्धकांनी गाण्याची विनंती केली. त्यावेळी एक खास गाण्यावर रेखा भारद्वाज यांनी आपल्या गायकीने सुरांची जादू पहायला मिळाली. यावेळी शाहिद आणि कंगना आणि सैफ अली खान यांच्यासमोर स्पर्धकांनी त्यांचे फेव्हरेट गाण्यांवर परफॉर्मन्स देत या गाण्यावंर  या तिघांनाही थिरकण्यास भाग पाडले.यावेळी शाहिद आणि कंगना आणि सैफ या स्पर्धकांसह मस्तीच्या मूडमध्ये दिसले. दोघांनाही या कार्यक्रमात सहभागी होत स्पर्धकांसह रसिकांनाही फुल ऑन एंटरटेन केले. विशेष म्हणजे  'बाहुबली' या सिनेमाचा गायक एल.व्ही.रेवंथ(हैद्राबाद) हा ही स्पर्धक म्हणून इंडिय आयडलमध्ये सहभागी झाला आहे.जेव्हा रेवंथने आपल्या परफॉर्मन्सला सुरूवात केली. त्याचेवळी शाहिद कपूरही या गाण्यावर ताल धरण्यासाठी स्वत:लाह थांबवू शकला नाही.स्टेजरवर येत शाहिद कपूरने रेवंथसह धमाकेदार डान्स केला. 'इंडियन आयडल'चे विजेतेपद पटकावण्यासाठी  देशाच्या कानाकोप-यातून स्पर्धक या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत.12 वर्षापूर्वी इंडियन आयडलची सुरूवात झाली होती.यांत मराठमोळ्या अभिजीत सांवतने पहिला इंडियन आयडल बनत अख्या महाराष्ट्राची मान उंचावली होती. या पहिल्या पर्वाने प्राजक्ता शुक्रे,राहुल वैद्य,अमित साना,अमित टंडन असे अनेक गायक दिले.आजही या गायकांची जादू कायम आहे. अंदाज,रियाज आणि आवाज अशाच प्रकारच्या हटके थीम असल्यामुळे इंडियन आयडल सगळ्यांच्या पसंतीस उतरताना दिसतंय. पुन्हा एकदा अनु मलिक फरहा खान आणि सोनु निगम ही तिकडी या कार्यक्रमाला जज करत आहेत.. इंडियन आयडलच्या यंदाच्या पर्वासाठी 160 स्पर्धकांमधून 14 स्पर्धक निवडण्यात आले आहेत.