Join us  

​देख भाई देख या मालिकेतील 'हा' 22 वर्षांनंतर छोट्या पडद्यावर परतला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2016 5:49 PM

देख भाई देख ही नव्वदीच्या दशकातील गाजलेली मालिका आहे. या मालिकेचे कथानक, या मालिकेतील कलाकार प्रेक्षकांना खूपच आवडले होते. ...

देख भाई देख ही नव्वदीच्या दशकातील गाजलेली मालिका आहे. या मालिकेचे कथानक, या मालिकेतील कलाकार प्रेक्षकांना खूपच आवडले होते. या मालिकेत शेखर सुमन, फरीदा जलाल, नवीन निश्चल, विशाल सिंग यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या मालिकेतील कलाकारांसोबतच या मालिकेच्या यशाचे श्रेय या मालिकेच्या तांत्रिक टीमलादेखील देणे गरजेचे आहे. या मालिकेच्या एडिटिंगचे काम ओनिर यांनी केले होते. आज ओनिरने अनेक प्रसिद्ध चित्रपट बॉलिवुडला दिले आहेत. ओनिर 22 वर्षांनंतर छोट्या पडद्यावर परतत आहे. पण आता तो एडिटर नव्हे तर दिग्दर्शक म्हणून छोट्या पडद्यावर काम करणार आहे. परदेस में है मेरा दिल या मालिकेचे तो दिग्दर्शन करत आहेत. तो सांगतो, "या मालिकेची कथा ही नातेसंबंधावर आधारित असल्याने मी ही मालिका करण्याचे ठरवले. ही मालिका दिग्दर्शित करताना मी एखादी मालिका नव्हे तर एक शॉर्टफिल्मचे दिग्दर्शन करत आहे असे मला वाटत आहे. चित्रपटाप्रमाणे मालिका हे दिग्दर्शकाचे माध्यम नाही असे मला नेहमी वाटायचे. त्यामुळेच मी छोट्या पडद्यापासून इतकी वर्षं दूर राहिलो होतो. तसेच टिव्हीवर काम करायचे असल्यास तुम्हाला जास्तीत जास्त वेळ द्यावा लागतो. माझ्याकडे तितका वेळ नसल्याने मी मालिकांकडे वळलो नव्हतो. पण छोटा पडदा हे आज महत्त्वाचे माध्यम असल्याने मी मालिका करण्याचे ठरवले."ओनिर यांनी माय ब्रदर निखिल... या प्रसिद्ध चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.