छोट्या पडद्यावरील अभिनेत्री सेजल शर्मा हिने शुक्रवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सेजय शर्मा ही दिल तो हॅप्पी है जी या मालिकेमुळे सेजल शर्मा ही प्रसिद्धीच्या झोतात आली होती. तिच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. सेजल शर्मा ही मीरा रोड येथे वास्तव्यास होती.मीडिया रिपोर्टनुसार, सेजलने आत्महत्या करण्यापूर्वी एक लेटर लिहिलं होतं. जे पोलिसांना मिळालं आहे. आत्महत्या करण्यामागचे कारण डिप्रेशन सांगितलं जात आहे. मात्र सेजलच्या आईचं म्हणणं वेगळं आहे. सेजलच्या आईचं म्हणणं आहे की, सेजल डिप्रेशनमध्ये नव्हती. तिला लीड रोल मिळाला होता.
अमर उजालाच्या रिपोर्टनुसार, सेजलच्या आईने सांगितलं की सेजल लवकरच मुख्य भूमिका करताना दिसणार होती. खरंतर सेजलच्या आईलाही तिच्या आत्महत्येचे खरं कारण माहित नाही. सेजलचा दिल तो हॅप्पी है मालिकेतील सहकलाकार डोनल बिष्टने सांगितलं की, सेजलच्या आत्महत्या करण्याच्या दोन दिवस आधी तिने ऑडिशन दिले होते आणि ती सिलेक्टही झाली होती. मात्र पोलिसांना मिळालेल्या चिठ्ठीनुसार सेजलने लिहिले होते की जीवनातील प्रेशर सांभाळू शकत नव्हते.
तिने आई वडिलांची माफी मागत लिहिले होते की, तिच्या मृत्यूच्या धक्क्यात त्यांना जगावे लागेल म्हणून माफी मागितली होती. सेजलच्या मृत्यूला कोणीही जबाबदार नाही.