‘सेन्सेक्स’ स्टार्स...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2016 9:44 AM
‘सेन्सेक्सने भरारी घेतली; सेन्सेक्स आपटला’ अशा आशयाच्या बातम्या रोजच कानावर पडत असतात. अगदी अशीच काहीशी स्थिती काही टीव्ही स्टारबाबतही ...
‘सेन्सेक्सने भरारी घेतली; सेन्सेक्स आपटला’ अशा आशयाच्या बातम्या रोजच कानावर पडत असतात. अगदी अशीच काहीशी स्थिती काही टीव्ही स्टारबाबतही आहे. एकेकाळी यशाच्या सर्वोत्तम शिखरावर असलेले काही टीव्ही स्टार निव्वळ अहमभावामुळे तेवढ्याच वेगाने सेन्सेक्सप्रमाणे जमिनीवर आले आहेत. याचे उत्तम उदाहरण ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या मालिकेतून एकेकाळी घराघरात पोहोचलेला अन् प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या अमर उपाध्याय याचे देता येईल. या मालिकेने अमरला छोट्या पडद्याच्या दुनियेत एक वेगळा रुबाब मिळवून दिला होता; मात्र कालांतराने छोट्या पडद्यावर काम करणे त्याला अपमानास्पद वाटू लागले. प्रेक्षक आपल्याला मोठ्या पडद्यावरही पसंत करतील. आपला चित्रपट बघण्यासाठी थिएटर्समध्ये गर्दी करतील या भावनेतून त्याने टीव्ही मालिकांना सोडचिठ्ठी देत मोठ्या पडद्यावर नशीब आजमावण्यासाठी धाव घेतली. अपेक्षेप्रमाणे त्याला काही चित्रपटांमध्ये काम करण्याची संधीही मिळाली, मात्र त्याचे चित्रपट कधी आले अन् कधी गेले हे कळालेच नाही. कदाचित त्याला याचा विसर पडला असावा की, टीव्ही मालिका बघण्यासाठी प्रेक्षकांना पैसे मोजावे लागत नाहीत, मात्र थिएटर्समध्ये चित्रपट बघण्यासाठी पैसे मोजावे लागतात. उशिरा का होईना अमरला याची जाणीव झाली असून, त्याला आता टीव्हीवरचे दिवस आठवत आहेत. त्यामुळेच की काय तो आता एका वाहिनीवरील ‘चॉँद के पार ले चलो’ मालिकेत दुय्यम भूमिका साकारण्यासाठी राजी झाला आहे. शिल्पा आनंद‘दिल मिल गए’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली ‘रिधिमा’ अर्थात शिल्पा आनंद हिचादेखील ‘बॅक टू स्मॉल स्क्रीन’ असाच प्रवास आहे. छोट्या पडद्यावर तुफान प्रसिद्धी मिळाल्यानंतरही शिल्पाने २००८ मध्ये ‘दिल मिल गए’ या मालिकेला बाय-बाय करीत मोठ्या पडद्यावर झळकण्यासाठी धडपड केली. अपेक्षेप्रमाणे तिला काही चित्रपटांमध्ये संधीही मिळाली; मात्र प्रेक्षकांनी तिला मोठ्या पडद्यावर फारसे पसंत केले नाही. अखेर २०१० मध्ये पुन्हा ती याच टीव्ही मालिकेत वेगळ्या अवतारात परतली. परंतु मोठा पडदा तिला वारंवार खुणावत असल्याने ती ‘ब्लडी इश्क’ या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर आली; मात्र प्रेक्षकांनी तिला पुन्हा नाकारले. आता ती पुन्हा टीव्ही मालिकांमधील भूमिकेसाठी धडपड करीत आहे. कविता कौशिक‘एफआयआर’मधील चंद्रमुखी चौटाला कोणाला आठवत नसेल तरच नवल. डॅशिंग अन् दमदार डायलॉगच्या जोरावर या मालिकेने बघता-बघता ८०० एपिसोड पूर्ण केले; मात्र याच दरम्यान म्हणजेच २०१३ मध्ये कविताने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. परंतु तिचा हा निर्णय पूर्णत: चुकीचा असल्याची तिला जाणीव झाली. अन् पुन्हा ती याच अवतारात मालिकेत परतली. मालिकेत परतल्यानंतर मालिका सोडण्याचा माझा निर्णय चुकीचा असल्याचे खुद्द कवितानेच कबूल केले होते. सुनील ग्रोवरकॉमेडी नाइट्स विद कपिल शर्मा या शोमधील ‘गुत्थी’ या पात्राला प्रेक्षकांनी तुफान पसंती दिली. आजही प्रेक्षक सुुनील ग्रोवरला त्याच्या खºया नावापेक्षा गुत्थी या नावानेच अधिक ओळखतात; मात्र कपिल शर्माशी झालेल्या मतभेदामुळे अन् आपणही कॉमेडीमधील शहेनशाह असल्याच्या अहमभावातून स्वत:चा शो काढणाºया सुनील ग्रोवरला प्रेक्षकांनी सपशेल नाकारले. अखेर सुनीलला त्याची चूक लक्षात आली अन् पुन्हा त्याने कपिलचा हात धरला. कपिलनेदेखील ‘सुुबाका भुला जब शॉँम को वापस आये तो उसे भुला नही कहते!’ असे म्हणत त्याला शोमध्ये संधी दिली. नौशीन सरदार अलीएकता कपूर हिच्या ‘कुसुम’ व ‘बींद बनूंगा घोड़ी चढूंगा’ यासारख्या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या नौशीन सरदार अली हिनेदेखील एकेकाळी छोट्या पडद्यावरून एक्झिट घेतली होती. परंतु ती पुन्हा छोट्या पडद्यावर परतली आहे. लोकप्रिय शो ‘गंगा’मध्ये तिने राहत नावाच्या महिलेची भूमिका साकारली आहे. त्याचबरोबर ती एका कॉमेडी शोमध्येदेखील परतणार आहे. करण सिंह ग्रोवरछोट्या पडद्यावरचा सलमान खान अशी ओळख असलेल्या करण सिंह ग्रोवरला अतिशय नखरेल अभिनेता समजले जाते. कारण आतापर्यंतचा त्याचा इतिहास बघितल्यास करणचा कुठलाही शो हिट झाला की तो त्या शोला सोडचिठ्ठी देतो. जसे की ‘दिल मिल गए’ या मालिकेतून करणने काढता पाय घेतला अन् मालिकेच्या टीआरपीचे सर्व गणितच बिघडून गेले. करणने छोट्या पडद्यावरून मोठ्या पडद्यावर दमदार सुरुवात केली. बघता-बघता तो बॉलिवूडमधील ब्लॅक ब्यूटि म्हणून ओळख असलेल्या बिपाशा बसूच्या प्रेमात पडला अन् तिच्याशी लग्नही केले. परंतु लग्नानंतरचा विचार केल्यास करणकडे फारसे चित्रपट नाहीत. त्यामुळे तो पुन्हा छोट्या पडद्याकडे वळतो की काय, अशी चर्चा आत रंगू लागली आहे. करण मेहरा‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या सुपरहिट मालिकेतील आदर्श मुलगा नैतिक अर्थात करण मेहरा याला प्रेक्षकांनी तुफान प्रसिद्धी दिली. त्याची भूमिका प्रेक्षकांना एवढी भावली की, प्रत्येक वर्षी तो मालिका सोडणार अशा अफवा उठविल्या जात होत्या. प्रेक्षकदेखील निर्मात्यांना पत्र पाठवून टीआरपीवर परिणाम होईल अशा धमक्या देत होते. बºयाचदा करणनेच या अफवांचे खंडन करीत मी मालिका सोडणार नसल्याचे जाहीर केले. परंतु जून २०१६ मध्ये त्याने तब्येतीचे कारण देत मालिका सोडण्याचा निर्णय घेतला अन् प्रेक्षकांचा हिरमोड झाला. ही अफवा असावी असाही समज प्रेक्षकांमध्ये पसरला मात्र जेव्हा करणच्या पत्नीने सोशल मीडियावर याबाबत जाहीर केले तेव्हा प्रेक्षकांचा विश्वास बसला. ही मालिका २००९ मध्ये सुरू झाली होती.