‘भाखरवडी’ या कॉमेडी मालिकेच्या सेटवर काम करणाºया एका कर्मचाºयाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने खळबळ माजली आहे. मालिकेच्या टीममधील आणखी आठ लोकांनाही कोरोनाची लागण झाली आहे. यानंतर 26 जुलैपासून 3 दिवसांसाठी मालिकेचे शूटींग थांबवण्यात आले आहे.मालिकेचे निर्माते जे डी मजीठीया यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
आजतकला दिलेल्या माहितीत त्यांनी सांगितले की, कोरोनामुळे निधन झालेला कर्मचारी अब्दुल आमच्याकडे टेलर होता. तो गेल्या 10-12 वर्षांपासून आमच्यासोबत काम करत होता. 1 काही दिवसांपूर्वी त्याला अशक्तपणा जाणवत होता. डॉक्टरांनी त्याला व्हायरल इन्फेक्शन असल्याचे सांगितले होते. 11 तारखेला तो तो अगदी बरा होता. मात्र 13 तारखेला त्याला पुन्हा अस्वस्थ वाटू लागले. मी थोड्या दिवसांसाठी घरी जातो, असे म्हणून तो गेला. 21 तारखेला आम्ही त्याची प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी फोन केला असता त्याचे आत्ताच निधन झाल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी आम्हाला सांगितले. आमच्यासाठी हा धक्का होता.
अब्दुलच्या निधनानंतर ‘भाखरवडी’ च्या सर्व टीमची कोरोना टेस्ट करण्यात आली. सोमवारी आलेल्या रिपोर्टनुसार आठ लोक कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. त्या सर्वांना आयसोलेट करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.यापूर्वी मेरे साई आणि बी.आर. आंबेडकर या मालिकेच्या सेटवर कोरोनाने धडक दिली होती. एक महानायक-डॉ. बी.आर. आंबेडकर या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणाºया एका कलाकाराला कोरोना झाला होता.