या मालिकांनी गाठला 100 भागांचा टप्पा!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2018 9:41 AM
‘क्या हाल, मिस्टर पांचाळ?’,‘निम्की मुखिया’ आणि ‘साम दाम दंड भेद’ या मालिका आज आपल्या 100 व्या भागाचे प्रसारणकरतील. ...
‘क्या हाल, मिस्टर पांचाळ?’,‘निम्की मुखिया’ आणि ‘साम दाम दंड भेद’ या मालिका आज आपल्या 100 व्या भागाचे प्रसारणकरतील. प्रेक्षकांची मने गुंतवून ठेवणा-या कथानक आणि मनाला सहज पटतील अशा व्यक्तिरेखांमुळे ‘स्टार भारत’नेप्रसारित केलेल्या विविधरंगी मालिकांनी प्रेक्षकांच्या मनाची पकड घेतली आहे.‘क्या हाल, मिस्टर पांचाळ?’ मालिकेत कन्हैय्याची भूमिका रंगविणारा अभिनेता मणिंदरसिंह म्हणतो, “आमच्या या मालिकेचे 100 भाग पूर्ण होत आहेत,यावर माझा विश्वासच बसत नाहीये. मी या मालिकेच्या सेटवर आलो आणि कन्हैय्याची भूमिका रंगवायला लागलो, ही कालच घडलेली घटना वाटते. तुम्ही आपल्या कामाचा आनंद घेत असताना, विशेष मेहनत घेत असताना आणि त्याद्वारे अनेक सुखद स्मृती तयार करीत असताना काळ कसा धावतो, याची जाणीवच तुम्हाला होत नाही.आमची मालिका सर्व प्रेक्षकांना अतिशय आवडली, याचा मला खूप आनंद वाटतो.”‘निम्की मुखिया’ची प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री भूमिका गुरुंग सांगते, “निम्कीची भूमिका उभी करणं आणि आतामी जिकडे जाते, तिथे मला याच नावाने ओळखलं जाणं ही माझी सर्वात मोठी कमाई आहे, असं मी मानते. या मालिकेचेएक हजारच नव्हे, तर पाच हजार भाग पूर्ण होवोत आणि आम्हाला प्रेक्षकांचं प्रेम असंच उत्तरोत्तर लाभत राहो, अशीचमाझी अपेक्षा आहे. प्रेक्षकांचा हा उदंड प्रतिसाद नक्कीच उत्साहवर्धक आहे. निम्की मुखियाशी संबंधित आमच्या संपूर्णटीमला, या वाहिनीला आणि सर्वांनाच मी शुभेच्छा देते.”‘साम दाम दंड भेद’मध्ये विजयची भूमिका साकारणारा अभिनेता भानू उदय म्हणाला, “या मालिकेचा हा महत्त्वाचा टप्पामी तिच्याशी संबंधित प्रत्येकाला- ही वाहिनी, निर्माते, क्रिएटिव्ह टीम तसंच लेखक वगैरे सर्वांनाच अर्पण करतो.प्रत्येकजण अप्रतिम कामगिरी करीत असून त्यांच्या या सामूहिक प्रयत्नांमुळेच या मालिकेने आज हा महत्त्वाचा टप्पागाठला आहे. या मालिकेशी संबंधित असल्याचा आम्हा सर्वांनाच अतिशय अभिमान वाटतो.”या वाहिनीवरून ‘काळभैरव रहस्य’, ‘जीजी माँ’, ‘क्या हाल, मिस्टर पांचाळ?’, ‘निम्की मुखिया’, ‘साम दाम दंड भेद’, ‘जय कन्हैय्या लाल की’, ‘सावधान इंडिया’ यासारख्या मालिकांचे प्रसारण केले जात आहे. आता नववर्षापासून स्टार भारतवर नव्या मालिकांचे प्रसारण केले जाईल. या मालिकांचे विषय तर वेगळे असतीलच, पण आजवर भारतीय टीव्हीवरून जे विषय कधी हाताळले गेले नाहीत, अशा विषयांवर या मालिकांची संकल्पना आधारित आहे.