स्टार प्रवाहवरील ‘विठुमाऊली’ मालिकेतून विठुरायाच्या भक्तीचा महिमा अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना मिळत असते. या पुढील भागांमध्येही विठोबाच्या दिव्यत्वाची प्रचिती घेता येणार आहे.
विठ्ठलाचा लाडका भक्त पुंडलिकाच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. पुंडलिकाला यमसदनी धाडण्याचे षडयंत्र कलीने आखले आहे. पुंडलिक विठ्ठलाचा श्रेष्ठ भक्त होऊ नये यासाठी कलीने बरेच प्रयत्न केले, पण पुंडलिकाच्या भक्तीपुढे कलीची कारस्थाने नेहमी फिकी पडली. यावेळी मात्र पुंडलिकाला धडा शिकवण्यासाठी कली यमाचे रुप धारण करणार आहे. पुंडलिकाला यमसदनी धाडण्याचा कलीचा डाव यशस्वी होणार का? विठुराया लाडक्या भक्ताचा जीव वाचवणारा का? कलीला त्याच्या कुकर्मांचं शासन मिळणार का? याची उत्तर ‘विठुमाऊली’च्या विशेष भागातून मिळणार आहेत. हा विशेष भाग १० नोव्हेंबरला संध्याकाळी सात वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर पाहायला मिळणार आहे.