Join us

लवकरच बंद होणार 'या' मालिका, नवीन मालिका येणार रसिकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 10:36 AM

स्पर्धेच्या युगात कधी येतात कधी जातात समजणेही कठिण असते. त्यापैकी अशा काही मालिका ज्या लवकरच बंद होणार आहेत. 

छोट्या पडद्यावर रोज नवीन नवीन मालिका येतात जातात.......काही निवडक मालिका असतात त्या खूप वर्ष रसिकांचे मनोरंजन करतात. मात्र काही मालिका अशाही असातात. ज्या कधी येतात कधी जातात समजणेही कठिण असते. त्यापैकी अशा काही मालिका ज्या लवकरच बंद होणार आहेत. 

ये उन दिनों की बात है

90च्या दशकातील लव्हस्टोरी तरुणांमध्ये खूप हिट झाली. नेहमीच्या  सास-बहू टाईप मालिकाच सर्वात जास्त काळ या शर्यतीत टीकू शकतात. त्यामुळे कुठे ना कुठे थांबायचे होते. या मालिकेची स्टोरी ही आणखी जास्त चालु शकत नाही. त्यामुळे निर्मात्यांनी ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 16 ऑगस्टमध्ये ही मालिका संपणार आहे. 

लेडीज स्पेशल

 तीन स्थानिक रेल्वे प्रवासी महिलांच्या जीवनावर आधारित आहे. अमिताभ बच्चन यांचा रिअॅलिटी शो 'कौन बनेगा करोडपती' याच्या जागी दाखवला जाणार आाहे. या मालिकेतील तीन अभिनेत्री छवी पांडे, गिरिजा ओक आणि बिजल जोशी रेल्वेत प्रवास करताना मैत्रिणी होतात. मालिकेला हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने ती बंद करण्यात येणार आहे.

मैं मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो

मालिका सुरुवातीला लोकांना आकर्षित करू शकली नाही. मात्र, काही आठवड्यांनंतर तिला चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र मालिकेची सुरूवातच डळमळीत असल्यामुळे रसिकांची पसंती मिळण्यात ही मालिका बंद पडली.

 

केसरी नंदन 

 

'केसरी नंदन' एक युवा मुलगी केसरी (चाहत तिवानी)ची कथा आहे. तिला आपले वडील हनुमंत सिंह (मानव गोहिल) प्रमाणे पहिलवान होण्याची इच्छा असते. या मालिकेला लोकप्रिय व्यक्तिमत्त्व मेरी कोम आणि गीता फोगट यांनी लाँच केले होते. सुरुवातीच्या आठवड्यात चांगली चर्चा होती. मात्र, सहा महिन्यांनंतर मालिका बंद होण्याची वेळ आली आहे.

झॉंंसी की रानी 

 

ऐतिहासिक मालिका 'झांसी की रानी' सुरू झाल्यापासून टीआरपीच्या यादीच्या जवळपासही पोहोचली नाही. याच्या नंबरातही वाढ झाली नाही आणि त्याच्या टीआरपी रेटिंगमध्येही चांगली जागा मिळाली नाही. त्यामुळे वाहिनीने ती मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला.