‘स्टार प्लस’वरील ‘ये रिश्ते है प्यार के’ या मालिकेत अबीरची भूमिका रंगविणारा अभिनेता शाहीर शेखने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा निर्माण आहे. या मालिकेतील त्याची अबीरची व्यक्तिरेखा ही मोकळ्या मनाची आणि दूरदृष्टीचीच आहे, असे नव्हे, तर आपण समाजाचे काही देणे लागतो, अशा कृतज्ञतेची आहे. मालिकेची नायिका मिष्टी हिचा तो एक सच्चा मित्र आहे. त्याच्या पडद्यावरील या व्यक्तिरेखेचे शाहीरच्या वास्तव स्वभावाशी खूपच साम्य असून आपल्या मित्रांना अडचणीच्या काळात मदत करणे हा त्याचा सवयीचा भाग आहे.
सूत्राने सांगितले, “शाहीरची एक खूप जवळची मैत्रीण ही पालकांच्या दबावाखाली होती. पालकांना तिचे लग्न करायचे होते. पण ज्या मुलाशी त्यांना तिचे लग्न लावायचे होते, त्या मुलाची तिला कसलीच माहिती नव्हती. त्यामुळे अशा अनोळखी मुलाला लग्नाला होकार देण्याची तिची इच्छा नव्हती. त्याच्या स्वभावाची माहिती करून घेण्यासाठी तिने पालकांकडे काही वेळ मागितला. शाहीर हा विश्वासू आणि भरवसा टाकण्याजोगा मित्र असल्याने त्याने तिला याबाबतीत सल्ला दिला की तिने आपल्या भावी जोडीदाराची माहिती करून घेण्यासाठी पुरेसा वेळ घ्यावा. तिने यासंदर्भात कणखर मनाने स्वत:चा निर्णय घ्यावा, अशी सूचनाही त्याने तिला केली. त्याने तिच्या पालकांनाही तिची अडचण समजावून सांगितली आणि पालक व मैत्रिणीमधील तणाव शांत केला.”
एक मित्र म्हणून शाहीरने केलेले प्रयत्न आणि तिची बाजू लक्षात घेऊन तिच्या मागे उभे राहण्यचा त्याचा निर्णय हा निश्चितच प्रशंसनीय आहे. यातून तो तिचा सच्चा मित्र आहे, हेच दिसून येते. ‘ये रिश्ते है प्यार के’ या मालिकेतही अबीरच्या भूमिकेत तो मिष्टीला पाठिंबा देतो आणि आपला भाऊ कुणाल याच्याशी लग्न करण्यापूर्वी त्याच्याविषयी अधिक जाणून घेण्याच्या तिच्या भूमिकेला पाठिंबा देतो. इतकेच नव्हे, तर तो या दोघांमध्ये मध्यस्थ म्हणूनही काम करतो.