शहीर शेख आणि सुप्रिया पिळगावकर पुन्हा आले एकत्र, दिसणार या मालिकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2021 06:22 PM2021-07-03T18:22:05+5:302021-07-03T18:22:58+5:30
शहीर शेख आणि सुप्रिया पिळगावकर पुन्हा एकदा एकत्र पहायला मिळणार आहे.
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’च्या नवीन सीझनसाठी सर्व कलाकार आणि इतर सदस्य तयार होत असताना शहीर शेख आणि सुप्रिया पिळगावकर यांनी नवीन सीझनचे शूटिंग करताना पूर्वीच्या काही गंमतीजमती सांगितल्या. शूटिंग चालू असताना अभिनेते अगदी त्यात ओतप्रोत होऊन काम करतात पण मोकळा वेळ मिळाला की मात्र वाफाळता चहा आणि स्नॅक्सचा आस्वाद घेत घेत गप्पा गोष्टी करतात आणि सुंदर आठवणी निर्माण करतात.
या मालिकेत देवची भूमिका करत असलेला शहीर शेख म्हणतो, “कुछ रंग प्यार के ऐसे भी’ चे शूटिंग करण्यास आम्ही सर्व जण खूप उत्सुक होतो. आणि आता ते सुरू झाल्यावर असे वाटते आहे की जणू आम्ही कधी दूर झालोच नव्हतो. या टीमबरोबर काम करण्यात नेहमीच मजा येते. विशेषतः सुप्रिया मॅम आणि एरिका. आम्ही परत एकत्र झाल्यामुळे अवांतर वेळेत एकमेकांबद्दल अधिक परिचय करून घेण्याची आणखी एक संधी आम्हाला मिळाली आहे.”
शूटिंगच्या वेळेस अनुभवास येणारी मौज आणि आपलेपणा याबद्दल मालिकेत ईश्वरीची भूमिका करणारी सुप्रिया पिळगावकर म्हणते, “खरं सांगायचे तर, आम्ही कधी दूर होतो असे आम्हाला वाटतच नाही. सारे पुन्हा पूर्वीसारखेच वाटते आहे. इतक्या वर्षांनंतरही आमच्या परस्पर नात्यांमधला जिव्हाळा तसाच राहिला आहे. ब्रेकमध्ये आणि शूटनंतर आम्ही सगळे एकत्र बसून मजेत चहा घेतो आणि जुन्या आठवणींना उजाळा देतो. खूप छान वाटते.”
‘कुछ रंग प्यार के ऐसे भी – नई कहानी’ सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर लवकरच दाखल होणार आहे.