सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’च्या नवीन सीझनसाठी सर्व कलाकार आणि इतर सदस्य तयार होत असताना शहीर शेख आणि सुप्रिया पिळगावकर यांनी नवीन सीझनचे शूटिंग करताना पूर्वीच्या काही गंमतीजमती सांगितल्या. शूटिंग चालू असताना अभिनेते अगदी त्यात ओतप्रोत होऊन काम करतात पण मोकळा वेळ मिळाला की मात्र वाफाळता चहा आणि स्नॅक्सचा आस्वाद घेत घेत गप्पा गोष्टी करतात आणि सुंदर आठवणी निर्माण करतात.
या मालिकेत देवची भूमिका करत असलेला शहीर शेख म्हणतो, “कुछ रंग प्यार के ऐसे भी’ चे शूटिंग करण्यास आम्ही सर्व जण खूप उत्सुक होतो. आणि आता ते सुरू झाल्यावर असे वाटते आहे की जणू आम्ही कधी दूर झालोच नव्हतो. या टीमबरोबर काम करण्यात नेहमीच मजा येते. विशेषतः सुप्रिया मॅम आणि एरिका. आम्ही परत एकत्र झाल्यामुळे अवांतर वेळेत एकमेकांबद्दल अधिक परिचय करून घेण्याची आणखी एक संधी आम्हाला मिळाली आहे.”