Join us

शाहरुख खानची ऑनस्क्रीन लेक 'बिग बॉस'मध्ये झळकणार? परदेशात बॉयफ्रेंडसोबत लिव्हइन रिलेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2024 15:51 IST

शाहरुखच्या या रील लाईफ मुलीने आतापर्यंत अनेक रिएलिटी शो मध्ये आणि सिनेमांमध्येही काम केलं आहे.

Bigg Boss Ott 3: बिग बॉस सीझन 17 संपल्यानंतर आता बिग बॉस ओटीटीच्या तिसऱ्या सीझनची चर्चा आहे. बिग बॉस ओटीटी सीझन 3 कधी येतोय याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. दरम्यान या नव्या सीझनमध्ये कोण कोण स्पर्धक असतील याची नावंही बाहेर येण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये शाहरुखच्या ऑनस्क्रीन मुलीचं नाव आघाडीवर आहे. शाहरुखच्या या रील लाईफ मुलीने आतापर्यंत अनेक रिएलिटी शो मध्ये आणि सिनेमांमध्येही काम केलं आहे.

बिग बॉस ओटीटी सीझन 3 साठी अभिनेत्री सना सईदचं (Sana Saeed) नाव चर्चेत आहे. टेलिचक्कर रिपोर्टनुसार, बिग बॉस मेकर्सने सनाला शोसाठी विचारणा केली आहे. ३५ वर्षीय सनाने शाहरुख खान, काजोल आणि सलमान खानच्या 'कुछ कुछ होता है' सिनेमात अंजली ही बालकलाकाराची भूमिका साकारली होती. यानंतर ती करण जोहरच्याच 'स्टुडंट ऑफ द इयर' सिनेमातही दिसली. ३५ वर्षीय सना आता बिग बॉस ओटीटीमधून कमबॅक करण्याच्या तयारित आहे. मात्र अद्याप सनाकडून या बातमीवर शिक्कामोर्तब करण्यात आलेला नाही. पण ती जर शोमध्ये आली तर नक्कीच शोमधील वातावरण एकदम ग्लॅमरस होईल यात शंका नाही.

सना सईदने 'बादल', 'हर दिल जो प्यार करेगा' या सिनेमांमध्येही काम केलं. तर 'स्टुडंट ऑफ द इयर' मध्ये तिचा आणि आलिया भटचा छत्तीसचा आकडा होता. तिने वरुण धवनच्या गर्लफ्रेंडची भूमिका साकारली होती. याशिवाय सना 'झलक दिखला जा','नच बलिये','खतरो के खिलाडी' या रिएलिटी शोमध्येही दिसली आहे.

टॅग्स :सना सईदबिग बॉससलमान खान