शक्ति...अस्तित्व के एहसास की या मालिकेत सारा खानची एंट्री
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2017 5:39 AM
शक्ति...अस्तित्व के एहसास की या मालिकेच्या वेगळ्या कथेमुळे ही मालिका नेहमीच चर्चेत राहिली आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना ...
शक्ति...अस्तित्व के एहसास की या मालिकेच्या वेगळ्या कथेमुळे ही मालिका नेहमीच चर्चेत राहिली आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. या मालिकेद्वारे एक सामाजिक संदेश देण्याचा या मालिकेच्या निर्मात्यांनी प्रयत्न केले आहे. त्यामुळे या मालिकेने एक वेगळी जागा प्रेक्षकांच्या मनात निर्माण केली आहे. या मालिकेत आता लवकरच छोट्या पडद्यावरील एका प्रसिद्ध अभिनेत्रीची एंट्री होणार आहे.बिदाई या मालिकेमुळे नावारूपाला आलेली सारा खान शक्ति...अस्तित्व के एहसास की या मालिकेत प्रेक्षकांना मोहिनीच्या व्यक्तिरेखेत पाहायला मिळणार आहे. मालिकेत मोहिनीचा प्रवेश झाल्यानंतर मालिकेच्या कथानकाला एक वेगळी कलाटणी मिळणार आहे. मोहिनीसाठी पैसा हेच सर्वस्व आहे. ती एक लोभी स्त्री असून ऐश्वर्यसंपन्न जीवन जगण्याची तिची इच्छा आहे. ती अतिशय सुंदर असल्याने समोरचा बघताच क्षणी तिच्या प्रेमात पडतो. या भूमिकेविषयी बोलताना सारा खान सांगते, ‘‘मी या आधी साकारलेली प्रत्येक व्यक्तिरेखा ही पहिल्या पेक्षा अगदी वेगळी होती आणि आता ही मोहिनीची भूमिका सुद्धा अगदी वेगळी आहे. शक्ति...अस्तित्व के एहसास की या मालिकेत काम करायला मिळत असल्याचा मला प्रचंड आनंद होत आहे. प्रेक्षकांना या मालिकेतील माझी भूमिका आवडेल याची आम्हाला खात्री आहे.शक्ति...अस्तित्व के एहसास की या मालिकेच्या आगामी भागांमध्ये हरमनचे वडील हरक सिंग पैसे देऊन मोहिनीला घरात घेऊन येणार आहेत आणि हरमनला दाखविण्यासाठी ते तिच्याशी लग्न करणार आहेत. हे सगळे पाहून आईला साहाय्य करण्यासाठी तो घरी परत येईल अशी त्यांची यामागची भावना आहे. मोहिनी त्या घरात फक्त पैशाच्या मोबदल्यात व्यावसायिकतेच्या उद्देशाने आली आहे. पण त्यांची संपत्ती पाहून तिला लोभ सुटला आहे आणि ती हरकचे हृदय जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. तिची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी त्या घरात कायमचे राहण्याचे तिचे आता ध्येय आहे. मोहिनी तिच्या या प्लासनमध्ये यशस्वी होईल की नाही हे प्रेक्षकांना लवकरच शक्ति...अस्तित्व के एहसास की या मालिकेत पाहायला मिळणार आहे. Also Read : सारा खानला पाकिस्तानमध्ये चित्रीकरण करताना आला हा विचित्र अनुभव