Join us  

'मी तुमच्या दाढीला हात लावू?' KBC 16 मधील स्पर्धकाने व्यक्त केली इच्छा, अमिताभ म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 10:24 AM

KBC 16 च्या मंचावर सहभागी झालेल्या स्पर्धकाने बिग बींच्या दाढीला स्पर्श करण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा बिग बी काय म्हणाले बघा

KBC 16  ची सध्या चांगलीच चर्चा आहे. या शोमध्ये एकापेक्षा एक भन्नाट स्पर्धक सहभागी होताना दिसतात. हे स्पर्धक विविध कौटुंबिक पार्श्वभूमीतून आलेले असतात. KBC 16 च्या मंचावर जास्तीत जास्त रक्कम देऊन हे स्पर्धक त्यांची स्वप्नं पूर्ण करताना दिसतात. KBC 16 च्या मंचावर सहभागी झालेले हेच स्पर्धक अमिताभ यांच्याशी मजेशीर संवाद साधताना दिसतात. KBC 16 च्या मंचावर सहभागी झालेल्या अशाच एका स्पर्धकाने बिग बींच्या दाढीला हात लावण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा अमिताभ काय म्हणाले बघा

स्पर्धकाने व्यक्त केली दाढीला हात लावण्याची इच्छा, बिग बी म्हणाले...

KBC 16 च्या मंचावर अलका सिंग ही स्पर्धक सहभागी झाली आहे. अलका सिंगचं जेव्हा हॉटसीटसाठी नाव पुकारण्यात आलं तेव्हा तिच्या डोळ्यातून पाणी आलं. अमिताभ यांनी तिला टिश्यू दिले. टिश्यू देताना त्यांनी एक-दोन-तीन असे आकडेही मोजले. अलका सिंग ही गप्पिष्ट होती. ती बिग बींना अनेक प्रश्न विचारुन भंडावून सोडत होती. अशातच अलकाने बिग बींच्या दाढीला स्पर्श करण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा बिग बींनी मजेशीर उत्तर दिलं.

बिग बींनी दिलं अलकाला उत्तर

अलकाने  खेळता खेळता बिग बींना गुड बॉय म्हटलं. बिग बी हे ऐकताच गालातल्या गालात हसले. पुढे जेव्हा दाढीला स्पर्श करण्याची इच्छा अलकाने व्यक्त केली. ती म्हणाली, "आमच्या घरी कोणालाच दाढी नाही.  माझा भाऊ सुद्धा क्लीन शेव्ह करतो." तेव्हा बिग बी म्हणाले, "जेव्हा शो संपल्यावर सर्वजण फोटो काढायला येतील तेव्हा तुम्ही माझ्या दाढीला हात लावू शकता. याशिवाय जेव्हा तुमचा भाऊ ८२ वर्षांचा होईल तेव्हा तुम्ही भावाच्या दाढीला स्पर्श करु शकता." बिग बींनी दिलेल्या उत्तराने एकच हशा पिकला.

टॅग्स :अमिताभ बच्चनकौन बनेगा करोडपतीटेलिव्हिजन