Casting Couch:बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्रींना कास्टिंग काऊचचा सामना करावा लागतो ही नवीन गोष्ट नाही. टीव्ही आणि चित्रपट अभिनेत्री शमा सिकंदर(Shama Sikander) देखील यातून सुटू शकली नाही. एका मुलाखतीत शमा स्वत: कास्टिंग काउचवर मोकळेपणाने बोलली आणि म्हणाली होती की, कामाच्या बदल्यात सेक्सची मागणी करणे हे अत्यंत चुकीचे कृत्य आहे. असे करण्याचे धाडस कोणी करू नये.
शमाला पण मिळाली होती ऑफरशमा म्हणाली होती, जेव्हा मी इंडस्ट्रीत नवीन होते तेव्हा अनेक अभिनेते आणि निर्मात्यांनी मला त्यांचाशी मैत्री करण्यास सांगितले होते. मला वाटले की जेव्हा आपण एकत्र काम केले नाही तर मग आपण मित्र कसे होऊ शकतो. कामाच्या बदल्यात सेक्सची मागणी करणे मला चुकीचे वाटते. ही सर्वात खालची पातळी आहे. माझ्या मते, अशी मागणी करणारी अत्यंत असुरक्षित व्यक्ती असावी. शमाने देखील मान्य केले की इंडस्ट्रीत बरेच बदल झाले आहेत आणि आता या बाबतीत परिस्थिती सुधारली आहे. आताची जनरेशन प्रोफेशनल आहे. त्यांना कामाच्या बदल्यात सेक्स नको असतो. तो तुमच्याशी आदराने वागतात.
शमा म्हणाली की कास्टिंग काउच फक्त टीव्ही किंवा बॉलीवूडपुरते मर्यादित नाही तर इतर ठिकाणी ही आहे. कोणाचेही नाव न घेता शमाने सूचित केले की तिला काही नामवंत निर्मात्यांनी अनेक ऑफर दिल्या होत्या. या ऑफर्स मोठ्या निर्मात्यांनी दिल्या होत्या. शमाने ये मेरी लाइफ है आणि बालवीर सारख्या शोमध्ये काम केले आहे. याशिवाय ती नील नितीन मुकेशच्या बायपास रोड या चित्रपटात दिसली होती.