'बिग बॉस 15' (Bigg Boss) फेम शमिता शेट्टी अलीकडेच जवळचा मित्र आमिर अलीसोबत (Amir Ali) स्पॉट झाल्यामुळे चर्चेत आली. एका व्हिडिओमध्ये आमिर शमिताच्या कमरेवर हात ठेवून गालावर kiss करताना दिसत आहे आणि यामुळे इंटरनेटवर दोघांच्या डेटिंगच्या अफवांना उधाण आले आहे. जेव्हापासून शमिता शेट्टी आणि आमिरचा हा व्हिडिओ समोर आला आहे तेव्हापासून इंटरनेटवर खळबळ उडाली आहे आणि दोघेही एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. दरम्यान शमिताने या चर्चा धुडकावत स्पष्टीकरण दिले आहे.
काय म्हणाली शमिता शेट्टी ?आमिर अली सोबतच्या डेटिंगच्या चर्चांवर शमिताने ट्वीट करत स्पष्ट सांगितले. ती म्हणाली, 'मी समाजाची मानसिकता पाहून त्रासलेली आहे. प्रत्येक कृती आणि प्रत्येक व्यक्ती कोणतीही वास्तविकता तपासल्याशिवाय निर्णय का घेतो? नेटिझन्सच्या छोट्या विचारांपलीकडे सुद्धा काही गोष्टी असू शकतात. '
ती पुढे म्हणाली, आता यावर बोलायची वेळ आली आहे. 'मी सध्या सिंगल आहे आणि आनंदी आहे. देशातील इतर महत्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष देऊया.'