रायझिंग स्टार कार्यक्रमात शंकर महादेवन बनले या स्पर्धकांचे म्युझिक गुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2017 10:50 AM
रायझिंग स्टार या सिंगिंग रिअॅलिटी शोमध्ये स्पर्धकांनी येऊन गाणे सादर करायचे. लाईव्ह वोटींग करत ऑडीयन्सना जर एखाद्याचा परफॉर्मन्स आवडला ...
रायझिंग स्टार या सिंगिंग रिअॅलिटी शोमध्ये स्पर्धकांनी येऊन गाणे सादर करायचे. लाईव्ह वोटींग करत ऑडीयन्सना जर एखाद्याचा परफॉर्मन्स आवडला तो स्पर्धक या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पात्र ठरले. अशा प्रकारे हा पहिला शो आहे ज्यात जज चॉईसनुसार नाही तर रसिकांच्या चॉईसनुसार स्पर्धक निवडले जातात. शंकर महादेवन, दिलजित दोसांझ आणि मोनाली ठाकूर हे या शोला जज करत आहेत.रायझिंग स्टार च्या रविवारच्या भागात एक खास गोष्ट घडली. मथुरेचा स्पर्धक नीतीन नायक कडी आ मिल सांवल यार हे गाण्यार परफॉर्मन्स देत या शोमध्ये अधिक रंगत आणली.त्याच्या परफॉर्मन्स रसिकांसह जजेसनाही हा खूप भावला.विशेष म्हणजे रायझिंग स्टार हा शो नीतीनसाठी खूप लकी ठरला.त्याच्या या खास परफॉर्मन्समुळे शंकर महादेवन खूपच प्रभावित झाले. त्यांनी चक्क नीतीनलाच आपल्या म्युझिक अकॅडमीमध्ये गाण्याचे मोफत प्रशिक्षण देणार असल्याचे सांगितले.शंकर महादेवन यांच्या म्युझिक अकॅडमीमध्ये 67 अधिक देशांमध्ये भारतीय शास्त्रीय संगीत शिकवले जाते.त्यामुळे त्यांनी नीतीननेही त्यांची अकॅडमीत सहभागी होण्याची इच्छा शंकर महादेवनने या कार्यक्रमात व्यक्त केली.कधीही स्वप्नातही विचार केला नसेल असे खास गिफ्ट त्यादिवशी नीतीनला मिळाल्याने तो खूप भावूकही झाला होता. त्याचा आनंद त्याला शब्दांत व्यक्त करणेही शक्य नव्हते. त्याच्या कुटूंबियांनाही नीतीनचे कौतुक करत शंकर महादेवन यांनी त्यांच्या अकॅडमीत नीतनला सामिल करून घेणे म्हणजे त्यांचा आशिर्वाद मिळाल्यासारखे असल्याचे सांगितले.