अभिनेते शरद पोंक्षे गेल्या अनेक वर्षापासून मराठी चित्रपटसृष्टीमध्ये कार्यरत आहेत. मराठी कलाविश्वातील गुणी आणि आघाडीचा अभिनेता म्हणजे शरद पोंक्षे. उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर शरद पोंक्षे यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. उत्तम अभिनयासह शरद पोंक्षे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखले जातात. अनेकदा जाहीरपणे एखाद्या विषयावर भाष्य करत त्यांनी त्यांचं मत नोंदवलं आहे. परिणामी, बऱ्याचदा त्यांना ट्रोलिंगचाही सामना करावा लागला.
शरद पोंक्षे यांचे आपल्या कुटुंबाप्रती अतिशय जिव्हाळ्याचे नाते आहे. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुले आहेत. मुलाचे नाव स्नेह तर मुलीचे नाव सिद्धी आहे. शरद पोंक्षेचा मुलगा स्नेह हादेखील वडिलांप्रमाणे सिनेइंडस्ट्रीत कार्यरत आहे. शरद पोंक्षे यांना एक मुलगी असून ती कलाविश्वापासून कोसोदूर असल्याचं सांगण्यात येतं. त्यामुळे ती एका वेगळ्या क्षेत्रात तिचं नशीब आजमावत आहे. तर त्यांची मुलगी सिद्धीला वैमानिक व्हायचे आहे.
शरद पोंक्षे यांनी अलीकडेच इन्स्टास्टोरीवर अलिकडेच एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली होती. यात त्यांनी पिल्लू निघालं वैमानिक व्हायरला असं म्हणत लाडक्या लेकीना भावनिक निरोप देतानाचे फोटो शेअर केले होते. लेकसोबत काढलेले हे फोटो मुंबई इंटरनॅशल एअरपोर्टवरचे आहेत.
शरद पोंक्षे यांना कर्करोग झालेला असताना सिद्धीने त्यांची प्रचंड सेवा केली. विशेष म्हणजे दररोज रुग्णालयात ये-जा करुनही ती १२ वीत ८६ टक्के मार्क मिळवत उत्तीर्ण झाली.