बिग बॉस मराठीच्या Weekend चा डावमध्ये शरद उपाध्ये यांची उपस्थिती!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2018 4:55 AM
बिग बॉस मराठीमध्ये पहिल्या Weekend चा डावमध्ये कोणी एक सदस्य घरामधून बाहेर जाणार आहे, या बद्दलची धाकधूक प्रत्येक सदस्याच्या ...
बिग बॉस मराठीमध्ये पहिल्या Weekend चा डावमध्ये कोणी एक सदस्य घरामधून बाहेर जाणार आहे, या बद्दलची धाकधूक प्रत्येक सदस्याच्या मनामध्ये होती. या प्रक्रियेतून आपल्या आवडत्या स्पर्धकाला वाचवण्यासाठी प्रेक्षकांनी भरपूर मतं दिली असणार हे नक्की. बिग बॉस मराठीच्या घरामधून दर आठवड्याला कोणीतरी एक सदस्य घराबाहेर जाणार हे निश्चित. या घरामध्ये टिकायचं असेल तर सयंम आणि एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती अत्यंत महत्वाची असते.या पहिल्या आठवड्यामध्ये महेश मांजरेकरांनी पहिले ६-७ दिवस स्पर्धकांचे कसे गेले ? स्पर्धकांची एकमेकांबद्दलची मते ? त्यांना खटकत असलेल्या गोष्टी, घरामध्ये होणारी भांडण, तसेच घरामध्ये पडणारे ग्रुप्स ? कोण कुठे चुकले ? अशा अनेक विषयांवर मनमोकळेपणाने चर्चा केली.स्पर्धकांच्या मनातील गोष्टी जाणून घेण्याची आणि त्यांना आपली मते प्रेक्षकांसमोर तसेच घरच्यांसमोर मांडण्याची संधी दिली.या पहिल्या Weekend चा डावमध्ये रविवारी स्पर्धकांच्या राशींबद्दल माहिती सांगण्यासाठी ज्योतीशाचार्य आणि राशीचक्र या कार्यक्रमाचे विक्रमी ३००० प्रयोग केलेले श्री. शरद उपाध्ये यांनी उपस्थिती लावली होती.Also Read:बिग बॉस मराठीमधून 'या' कारणामुळे आरती सोलंकी झाली घराबाहेर! शरद उपाध्ये यांनी मंचावर महेश मांजरेकर यांच्याशी गप्पागोष्टी केल्यानंतर स्पर्धकांशी संवाद साधला. “बिग बॉस हा कार्यक्रम उत्तम आहे, हे १५ स्पर्धक १०० दिवस या घरामध्ये रहाणार.बाहेरच्या जगाशी कुठल्याही प्रकारचा संपर्क नसताना इतके दिवस रहाणे म्हणजे खूप मोठे मानसिक बळ लागते.मी या कार्यक्रमाला बघून भावून गेलो अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.स्पर्धकांच्या मनात असलेल्या अनेक शंकांचे त्यांनी निरसन केले.कोणी घरामध्ये कसे वागावे,घरामध्ये नक्की टिकण्यासाठी काय करावे, कोणाची राशी काय सांगते, त्यांचा बिग बॉसच्या घरामध्ये कसा निभाव लागेल ? घरामध्ये टिकण्यासाठी त्यांनी कोणती काळजी घेणे आवश्यक आहे ? अशा अनेक गोष्टी सांगितल्या. जुई गडकरी, राजेश शृंगारपुरे, स्मिता गोंदकर, उषा नाडकर्णी आणि अनिल थत्ते यांच्यासोबत त्यांनी संवाद साधला आणि घरातील सगळ्यांना मोलाचे सल्ले दिले.