Join us

बर्थ डे आहे प्राजूचा! सई ताम्हणकरने प्राजक्ता माळीला दिल्या शुभेच्छा, म्हणाली-"आज तुझ्यावतीने मी...",

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2023 2:34 PM

प्राजक्ताने ही सईच्या पोस्टवर रिप्लाय दिला आहे.

'जुळून येती रेशिमगाठी' मालिकेतून प्रेक्षकांना प्रेमात पाडणारी मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) आज ३४ वा वाढदिवस साजरा करत आहे. प्राजक्ताचा भला मोठा चाहतावर्ग आज प्राजूच्या वाढदिवसानिमित्त तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. प्राजक्ता माळीने आपल्या सहज सुंदर अभिनयाने आणि गोड हास्याने संपूर्ण महाराष्ट्रालाच प्रेमात पाडलं. तरुणांची तर ती क्रश झाली. तिचं हसणंही गोड, दिसणंही सुंदर आणि पहिल्याच मालिकेतून तिने केलेला अभिनयही अप्रतिम. अल्पावधीतच ती मराठी मनोरंजनसृष्टीतील मोठं नाव झाली.

सध्या प्राजक्ता महाराष्ट्राची हास्य जत्रा या शोचं सूत्रसंचालन करतेय. तिच्या वाढदिवसाच्या निमित्त हास्य जत्राच्या टीममधील अनेकांनी पोस्ट शेअर केल्या आहेत. पण त्यातील एका पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ती पोस्ट म्हणजे सई ताम्हणकरची. 

सईने प्राजक्ताच्या वाढदिवसानिमित्त तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर प्राजक्तासोबतचा फोटो शेअर केला आहे. सईने प्राजक्ताला वाढदिवसाच्या शुभेच्छा जरा हटके अंदाजात दिल्या आहेत. हप्पी बर्थ डे प्राजू. आज बिल्डिंगमध्ये फरसाण वाटते आहे तुझ्यावतीने, लव्ह यू. अशी मजेशीर पोस्ट तिने लिहिली आहे. प्राजक्ताने ही थँक्यू सई असा रिप्लाय तिला दिला आहे. 

  

 प्राजक्ताच्या करिअरबाबत बोलायचे झाले तर 'जुळून येती रेशीमगाठी' मालिकेतून ती घराघरात पोहोचली.  2010 साली आलेल्या 'फिरुनी नवी जन्मेन मी' मालिकेतून तिने अभिनयाला सुरुवात केली होती. नंतर 'बंध रेशमांचे' मालिकेतही तिने काम केले. यानंतर 2013 साली तिला 'जुळून येती रेशीमगाठी'मध्ये मुख्य भूमिका ऑफर झाली. 'जुळून येती रेशिगाठी' नंतर प्राजक्ताने 'नकटीच्या लग्नाला यायचं हं' या मालिकेतही काम केलं. ही मालिकाही प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. फक्त अभिनयच नाही तर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत तिने आपण कशातच कमी नाही हे दाखवून दिलं.. प्राजक्ताने 'लकडाऊन', 'चंद्रमुखी', 'हंपी', 'व्हाय', 'डोक्याला शॉट' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 'रानबाजार' या वेब सीरिजमध्येही प्राजक्ता महत्त्वाची भूमिका साकारताना दिसली होती.  

टॅग्स :प्राजक्ता माळीसई ताम्हणकर