Shark Tank India 2: आजकाल सोनी टीव्हीवरील लोकप्रिय बिझनेस रिअॅलिटी शो शार्क टँक इंडियाचा (Shark Tank India 2) दुसरा सीझन मोठी लोकप्रियता मिळवत आहे. या शोमध्ये एकापेक्षा जास्त उद्योजक येतात आणि त्यांची बिझनेस आयडिया सांगून फंड मिळवण्याचा प्रयत्न करतात. शार्क टँक शोचे जजेस नवीन उद्योजकांमध्ये गुंतवणूक करतात. हा शो उदयोन्मुख उद्योजकांना एक व्यासपीठ देतो.
शार्क टँक इंडियामध्ये नवीन जजची एन्ट्रीया शोप्रमाणेच या शोचे जजेसही चर्चेत असतात. शोच्या परीक्षकांच्या पॅनेलमध्ये पीयूष बन्सल(संस्थापक, लेन्सकार्ट), अनुपम मित्तल(संस्थापक, शादी डॉट कॉम), अमन गुप्ता(सीएमओ आणि सह-संस्थापक, बोट), विनीता सिंग(शुगर कॉस्मेटिक्सच्या सीईओ), नमिता थापर( एमक्युअर फर्मा सीईओ), आणि अमित जैन(कार देखो) यांचा समावेश आहे. यात आता आणखी एका शार्कची एन्ट्री होणार आहे.
कोण आहे नवीन शार्क ?शार्क टँक इंडियाच्या नवीन शार्कचे नाव विकास डी नहार (Vikas D Nahar) आहे. सुका मेवा आणि स्नॅक्स ब्रँड हॅपिलोचे ते संस्थापक आहेत. ते शार्क टँक इंडियाच्या नवीन डिजिटल-ओन्ली भाग शार्क टँक इंडिया गेटवे टू शार्क टँक इंडिया 2 चा भाग असणार आहे. अलीकडेच, शार्क टँक इंडियाच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवर विकास डी नहारसोबतच्या कार्यक्रमाच्या विशेष भाग शेअर करण्यात आला आहे.
20 वेळा अपयशी होऊनही 500 कोटींची कंपनी केलीया व्हिडिओमध्ये ते सतत अपयशी होऊनही 500 कोटींची कंपनी कशी बनवली हे सांगताना दिसत आहे. 2016 मध्ये त्यांनी केवळ 10,000 रुपयांमध्ये हॅपिलो कंपनी सुरू केली. आज या कंपनीची एकूण संपत्ती 500 कोटींच्या जवळ पोहोचली आहे. विकास डी नहार यांना 20 वेळा अपयशाला सामोरे जावे लागले होते. मात्र वारंवार अपयशी येऊनही त्यांनी हिंमत हारली नाही आणि दृढ निश्चयाने त्यांनी जिद्द कायम ठेवली.