Join us

Namita Thapar : "मूल हवं होतं, 25 इंजेक्शन्स अन्..."; शार्क टँकच्या नमिता थापरने सांगितला वेदनादायी अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2023 14:52 IST

Namita Thapar : शो दरम्यान नमिता भावूक झालेल्या पाहायला मिळल्या. आपला वेदनादायी अनुभव सांगितला आहे. 

सध्या टीव्हीवर सर्वात जास्त पाहिला जाणारा शो म्हणजे शार्क टँक इंडिया. या शो ची प्रचंड क्रेझ दिसून येत आहे. या शो मध्ये येणाऱ्या स्टार्टअप क्षेत्रातील उद्योजकांच्या बिझनेसमध्ये शार्क टँकमधील शार्क्स गुंतवणूक करायचे की नाही ते ठरवतात. यामधल्या एक शार्क म्हणजे नमिता थापर (Namita Thapar). या शो दरम्यान नमिता भावूक झालेल्या पाहायला मिळल्या. आपला वेदनादायी अनुभव सांगितला आहे. 

नमिता दुसऱ्यांदा गर्भवती कशा होऊ शकल्या नाहीत याची गोष्ट त्यांनी शेअर केली आहे. त्या म्हणाल्या, "माझ्या बाबतीत मी 28 वर्षांची असताना मला गरोदर राहायचे होते आणि 2 महिन्यांत मला गर्भधारणा झाली आणि नंतर नॉर्मल डिलिव्हरी झाली. त्यानंतर मला पुन्हा मूल हवं होतं. मी 3 ते 4 वर्षे प्रयत्न केले पण मला गर्भधारणा होऊ शकली नाही."

"मी 25 इंजेक्शन्स आणि भावनिक आणि शारीरिक वेदनांमधून गेले. मला आधीच एक मूल आहे. परंतु ज्या पालकांना मुले नाहीत त्यांची कल्पना करा. दोन प्रयत्नांनंतर, मी हार मानली आणि सांगितले की मी एका मुलासह आनंदी आहे. पण नंतर एक चमत्कार घडला आणि मी गरोदर राहिली. 10 वर्षांपासून मी माझ्या यूट्यूब चॅनेलवर याबद्दल बोलू शकले नाही." एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"