लोकप्रिय बिझनेस रिॲलिटी शो शार्क टँक इंडियाच्या दुसऱ्या सीझनला सध्या सुरूवात झाली आहे. 2 जानेवारीपासून शोचा दुसरा सीझन सुरू झाला आहे. शार्क टँक इंडिया सुरू होताच सोशल मीडियावर मीम्सचा पूर आला. शो सुरू झाल्यानंतर लोकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांना हा शो आवडला आहे, तर अनेक यूजर्सचं असं मत आहे की या शोमध्ये जास्त ड्रामा दाखवला जात आहे.
शोचे जजही वेगवेगळ्या कारणांमुळे ट्रोल होत आहेत. काही लोकांनी शोच्या जज नमिता थापर यांनी एका मेकअप ब्रँडमध्ये गुंतवणूक न केल्याबद्दल नाखूष होते. तर अनेक जणांना या शोमध्ये अशनीर ग्रोव्हर यांची कमतरता जाणवत आहे. अनेक नेटकऱ्यांनी शार्क टँकच्या या सीझनला ट्रोलही केलंय. शार्क टँक इंडिया 2 बद्दल लोकांचे काय म्हणणे आहे ते जाणून घेऊया.
शो मध्ये दुजाभाव?शार्क टँक इंडियाच्या जज नमिता थापर शोच्या सुरुवातीलाच सोशल मीडियावर ट्रोल झाल्या होत्या. शोच्या पहिल्या एपिसोडमध्ये एका मेकअप ब्रँडने खूप चांगल्या प्रकारे पिच केले. सर्व जज प्रभावित झाले, पण नमिता थापर यांना ते आवडले नाही. त्या म्हणाल्या की हा मेकअप ब्रँड त्याच्या सोबत असलेल्या जज विनिता सिंगच्या मेकअप ब्रँड शुगर कॉस्मेटिक्सशी स्पर्धा करू शकतो. यानंतर नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केले आणि त्यांचं टॅलेंट पाहण्याऐवजी ती मैत्रीला महत्त्व देत असल्याचेही नेटकऱ्यांनी म्हटले.
अशनीर ग्रोव्हर यांची कमतरताशार्क टँक इंडियाच्या पहिल्या सीझनमध्ये अशनीर ग्रोव्हर यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा होती. सोशल मीडियावर ते कायम ट्रेंड करत होते. आजही त्यांच्यावरील अनेक मीम्स व्हायरल होतात. पण अशनीर ग्रोव्हर शोच्या दुसऱ्या सीझनचा भाग नाहीत. अशा स्थितीत त्याचे चाहते निराश झाले आहेत आणि त्याची अनुपस्थितीदेखील जाणवत आहे.