​शर्मिला शिंदे या कारणामुळे बनली शर्मिला राजाराम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2017 05:26 PM2017-01-17T17:26:40+5:302017-01-17T17:26:40+5:30

पुढचे पाऊल या मालिकेमुळे नावारूपाला आलेली अभिनेत्री शर्मिला शिंदेने आता तिचे नाव बदलून शर्मिला राजाराम असे ठेवले आहे. कलाकारांनी ...

Sharmila Shinde created for this reason, Sharmila Rajaram | ​शर्मिला शिंदे या कारणामुळे बनली शर्मिला राजाराम

​शर्मिला शिंदे या कारणामुळे बनली शर्मिला राजाराम

googlenewsNext
ढचे पाऊल या मालिकेमुळे नावारूपाला आलेली अभिनेत्री शर्मिला शिंदेने आता तिचे नाव बदलून शर्मिला राजाराम असे ठेवले आहे. कलाकारांनी इंडस्ट्रीत येण्यापूर्वी त्यांचे नाव बदलणे यात काही नवीन नाही. पण शर्मिलाने अनेक मालिकांमध्ये काम केल्यानंतर आता नाव बदलयाचे ठरवले आहे. याविषयी शर्मिला सांगते, "नाव बदलायचे हे कित्येक दिवसांपासून माझ्या डोक्यात सुरू होते. तुमचे नाव ही तुमची ओळख असते. आज शर्मिला शिंदे या नावाने मला सगळे ओळखत आहेत. पण तरीही नाव बदलण्याचा मी निर्णय घेतला. लोक इंडस्ट्रीत येण्यापूर्वी नाव बदलतात. मी इंडस्ट्रीत आल्यानंतर नाव बदलले हा एकच फरक आहे. आपले नाव हे लहानपणी आपल्या घरातले ठेवतात तर आडनाव आपल्याला आपल्या वडीलांचे मिळते. त्यामुळे नाव अथवा आडनाव निवडण्याचे आपल्याला स्वातंत्र्य नसते. आज मी जे काही यश मिळवले आहे ते माझ्या आईवडिलांच्या आशीर्वादामुळेच.  त्यामुळे मला नेहमीच माझ्या आडनावाऐवजी माझ्या आईचे अथवा वडिलांचे नाव लावायचे होते. माझा स्वतःचा अंकशास्त्रावर खूप विश्वास आहे. त्यामुळे मी आई आणि वडील या दोघांचेही नाव अंकशास्त्रानुसार लावून पाहिले तर त्यात वडिलांचे नाव अंकशास्त्रानुसार अगदी योग्य जात होते. त्यामुळे मी यापुढे शर्मिला रराजाराम हेच नाव लावणार आहे. कलाकार हा केवळ एक कलाकार असतो. त्याला कोणतीही जात, धर्म नसते असे माझे वैयक्तिक मत आहे. त्यामुळे आता मी आडनाव लावणार नसल्याने माझा धर्म, जात कोणालाच ओळखता येणार नाही. 

Web Title: Sharmila Shinde created for this reason, Sharmila Rajaram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.