अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतने काही महिन्यांपूर्वी निर्माती क्षेत्रात पदार्पण केलं आहे. तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेची निर्मिती शर्मिष्ठाने केली आहे. शर्मिष्ठाच्या तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. निर्मितीनंतर पुन्हा एकदा शर्मिष्ठा अभिनयाकडे वळली आहे. लवकरच तिची झी मराठीवर ‘सारं काही तिच्यासाठी’ या मालिकेत दिसणार आहे.
या मालिकेचे कथानक दोन२ सख्ख्या बहिणींच्या भवती फिरते. ज्या गेले २० वर्ष एकमेकींना भेटल्या नाहीत. मोठी बहीण उमा तळकोकणात आपल्या सासरी सुखाने नांदतेय आणि लहान बहीण संध्या तिच्या मुली सोबत गेले २० वर्ष लंडनमध्ये स्थायिक आहे. शर्मिष्ठा यात संध्याची भूमिका साकारणार आहे.
आपल्या भूमिकेबाबत बोलताना शर्मिष्ठा म्हणाली, . मलाही एक लहान बहीण असल्यामुळे मला ही भूमिका खूप जवळची वाटते. दोन बहिणींच्या नात्याबद्दल व त्या एकमेकींशी कशा जोडलेल्या असतात ह्या बद्दल मला अप्रूप आहे. जेव्हा तुमचे आई-वडील तुमच्या जवळ नसतात तेव्हा तुम्हाला एकच व्यक्ती समजून घेऊ शकते ती म्हणजे तुम्ही बहीण असते. मला आज पर्यंत जेवढ्या भूमिका मिळाल्या त्या सगळ्या मी यशस्वीपणे साकारल्या. मला मिळालेल्या भूमिकांना जास्तीत जास्त न्याय देण्याचा प्रयत्न करते. कलाकाराने हे विसरू नये की एखादी संधी तुम्हाला यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवू शकते.
पुढे ती म्हणाली, मला खात्री आहे की प्रेक्षक ह्या मालिकेशी भावनिकरित्या जोडले जातील. कुटुंबामध्ये आपल्यापैकी प्रत्येकाला भाऊ-बहीण असतील पण ते आपल्या जवळ असतीलच असं नाही, काही जण कामासाठी, शिक्षणासाठी दूर परदेशात असतात तर काही वेगळ्या कारणांमुळे एकमेकांपासून दुरावलेले असतात, पण कितीही अंतर असलं तरीही मनाने आपण जवळच असतो.