सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. कलाकारमंडळी देखील सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. चाहत्यांच्या संपर्कात असतात. कलाकारांनाही ते साकारत असलेली भूमिका रसिकांना कितपत पसंतीस पात्र ठरत आहे की नाही याचाही अंदाज सोशल मीडियावर लवकर कळतो. मात्र अनेकदा सोशल मीडियाचा वापर कलाकरांसाठी डोकेदुखी ठरतो. नाहक मनस्ताप सहन करावा लागतो.
सध्या नेटीझन्सकडून कलाकारांना ट्रोल करण्याचे प्रकार वाढले आहेत. अनेकदा आवडत्या कलाकाराने नेगिटीव्ह भूमिका रसिकांना रुचत नाही त्यामुळे कधी कधी वैतागलेले रसिक सोशल मीडियावर आपला राग व्यक्त करताना दिसतात. शशांक केतकरला सध्या अशाच प्रकाराला सामोरे जावे लागले. शशांकचे सोशल मीडियावर प्रतंच फॅनफॉलोइंग आहे. त्याच्या प्रत्येक अपडेट तो तिथे शेअर करतो.
नुकतेच शशांक सोशल मीडियावर लाईव्ह आला होता. चाहत्यांसह संवाद साधत होता. तितक्यातच एका युजरने असभ्य भाषेत त्याला कमेंट केली. यावरच शशांकचा पारा चांगलाच चढला. कलाकारांनासुद्धा रिस्पेक्ट द्या, अधिक पुण्य लाभेल टीका करणा-या युजरला शशांकनेही चांगलेच सुनावले. मात्र त्यांचा वाद वाढत गेला. अत्यंत घाण भाषेत आम्ही कलाकारसुद्धा प्रत्येक कमेंटला रिअॅक्ट होऊ शकतो, पण फक्त मालिका आवडत नाही, तुम्ही निगेटिव्ह भूमिका करु नका, या गोष्टीला लॉजिक नाही वगैरे कमेंट्स एकीकडे. आम्ही फक्त चेहरे असतो, आमच्यावर किमान 15 जण असतात. शिवाय मला कलाकार म्हणून वेगळं काहीतरी करुन बघायचं होत आणि रसिकांनाही वेगळं काहीतरी बघायचं होतं. त्यासाठीच तर ही मालिका आहे” अशा शब्दात शशांकने त्याला खडसावलं.
अगदी रसिकांनी कल्पनाही केली नसणार अशा भूमिकेत शशांक केतकर सध्या मालिकेत झळकतो. आत्तापर्यंत नायकाच्या भूमिकेत दिसणारा शशांक या मालिकेतून प्रथमच निगेटीव्ह भूूमिकेत रसिकांच्या भेटीला आला आहे. आपली ही भूमिका रसिक कसे स्वीकारणार, याबाबत शशांक जरा साशंक होताच. त्यामुळे सुरुवातीलाच आता मला शिव्या खाव्या लागणार, असे त्याने म्हटले होते.
‘माझ्या मते, शिव्या खायला तयार राहावं लागणार आहे मला. एक अभिनेता म्हणून टीव्हीवर फार कमी वेळी प्रयोग करायला मिळतात,’ असे त्याने लिहिले होते.शिवाय या ‘खतरनाक’ संधीसाठी झी, कोठारे व्हिजन, आदित्यनाथ कोठारे, उर्मिला कोठारे यांचे आभार..., असेही त्याने म्हटले होते.