Join us

"यातल्याच एका खड्ड्यात जीव द्या .." रस्त्यांच्या बिकट अवस्थेवर चांगलाच भडकला शशांक केतकर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 4:55 PM

अभिनेता शशांक केतकरनं एक व्हिडीओ पोस्ट करत रस्त्यांची अवस्था दाखवली आहे.

मुंबईतील सध्याची रस्त्यांची स्थिती फारची बिकट आहे. अनेक ठिकाणी खड्डेमय रस्ते आहेत. पावसामुळे तर रस्त्यांची काही खराब झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक सेलिब्रिटींना रस्त्यांवरील खड्ड्यांसंदर्भात पोस्ट शेअर केल्या आहेत. आता अभिनेता शशांक केतकरनं ही एक व्हिडीओ पोस्ट करत रस्त्यांची अवस्था दाखवली आहे.

शशांक केतकरनं पोस्ट केलेला हा व्हिडीओ मालाड परिसरातील आहे. राजकारण बाजूला ठेवून सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन रस्त्ये चांगले करा असं असं शशांक म्हणतोय. अशा रस्त्यांवरून गाडी चालवणाऱ्याच्या महागड्या गाड्या खराब होत आहेत, नागरिंकाना नाहक भुर्दंड सहन करावा लागतोय, असं शशांकनं म्हटलंय.

हा व्हिडीओ पोस्ट करताना शशांकनं एक पोस्टही शेअर केली आहे. यात त्याने महत्त्वाचे पाच मुद्दे मांडलं आहेत. 

शशांकची पोस्टमुद्दा क्र. 1 - तू मूळचा पुण्याचा आहेस... तिथल्या रस्त्यांची काळजी कर तू. आम्हाला नको अक्कल शिकवू वगैरे म्हणणार्‍या लोकांनी यातल्याच एका खड्ड्यात जीव द्या 😅

मुद्दा क्र. 2 - हा video मुळात कोणाच्या तरी support साठी आणि कोणाला तरी विरोध म्हणून केलेला नाही. हे प्रश्न जनतेचे आहेत आणि ते फक्त एका शहरा पुरते मर्यादित नाहीत. हे देशातल्या सगळ्या roads बाददल माझं म्हणण आहे.

मुद्दा क्र 3 - रस्त्याच्या अशा अवस्थेला जे जबाबदार असतात त्यांनी एकदा हे imagine करून बघाव की ते त्यांच्या लहान मुला मुलीला या international school मध्ये सोडायला bike वरून आले आहेत किंवा म्हातार्‍या आई बाबांना डॉक्टर कडे घेऊन आले आहेत किंवा बायको बरोबर आहेत किंवा अगदी एकटे आहेत आणि ती तुमची bike या खड्यात अडकून बंद पडली, तुमचा तोल गेला, मागून bus आली आणि तुमच्या डोक्याचा चुरा करून गेली! एकदा imagine करा ही भीती!

मुद्दा क्र 4- उत्तम सोयी आणि उत्तम रस्ते मिळाल्यावर ते नीट वापरण्याची जबाबदारी आपली नागरिकांची सुद्धा आहे.

मुद्दा क्र 5- चला एक movement सुरू करु. हा चलता है attitude संपला पाहिजे! तुम्हाला असे रस्ते दिसले तर त्याचा Video post करा. मला आणि योग्य त्या authorities ना त्यात tag करा आणि हे करताना #YeNahiChalega हा hashtag वापरा. 

टॅग्स :शशांक केतकरसेलिब्रिटी