Join us

डोसे करता येतात? 28 लाख रुपये पगार मिळणार; शशांक केतकरने शेअर केला Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2023 13:32 IST

मद्रास फ्लेवर्स या हॉटेलने ही जाहिरात लावली आहे.

अभिनेता शशांक केतकर (Shashank Ketkar) सध्या आगामी सिनेमासाठी लंडनला गेला आहे. तिथे त्याच्या सिनेमाचं शूट सुरु आहे. लंडनमध्ये फिरताना तो अनेक फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर चाहत्यांसाठी पोस्ट करत असतो. तिकडे काही इंटरेस्टिंग, मजेशीर गोष्टी दिसल्या की तो सांगतो. 

दरम्यान लंडनमध्ये फिरताना त्याला एक असं हॉटेल दिसलं जिथे डोसे बनवणाऱ्याची गरज आहे. लंडनमधल्या मद्रास फ्लेवर्स या हॉटेलने ही जाहिरात लावली आहे. त्यावर लिहिलंय,'डोसा शेफ पाहिजे, 28 हजार डॉलर्स प्रतिवर्ष'. शशांक म्हणतो, ' तसं बरं चाललंय माझं पण तरी व्हावं का शिफ्ट?'

शशांकच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनीही मजेशीर प्रतिक्रिया केल्या आहेत. 'घरी डोसे बनवण्याचे काय मिळेना तिथं मिळतंय तर जावं..', 'मला पण येतात पण त्यासाठी लंडनला यायला नाही जमणार' अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्यात. 

शशांक सध्या स्टार प्रवाहवरील 'मुरांबा' मालिकेत अक्षय हे पात्र साकारतोय. मालिकेतील त्याची आणि रमा म्हणजेच शिवानी मुंढेकरची जोडी खूप पसंत केली जातीये. याशिवाय शशांक आगामी 'कैरी' या सिनेमाच्या शूटिंगसाठी लंडनला गेला आहे. यामध्ये त्याच्यासोबत सायली संजीव झळकणार आहे.

टॅग्स :शशांक केतकरमराठी अभिनेतालंडनसोशल मीडिया