छोट्या पडद्यावरील ‘होणार सून मी ह्या घरची’ मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे शशांक केतकर. या मालिकेतील श्री या भूमिकेमुळे त्याला लोकप्रियता मिळाली. शशांक अनेक गोष्टींबद्दल त्याचं मत अगदी परखडपणे व्यक्त करताना दिसतो. अनेकदा तो सोशल मीडियावरुन समाजातील घडामोडी आणि राजकारणाबाबत क्रिप्टिक पोस्टही शेअर करताना दिसतो. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शशांकने राजकारणावर भाष्य केलं.
शशांकने नुकतीच चित्रपट समीक्षक सौमित्र पोटे यांच्या ‘मित्र म्हणे’ पॉडकास्टला हजेरी लावली. या मुलाखतीत त्याने कलाविश्वातील करिअर, अडचणी यांसह अनेक विषयांवर स्पष्टपणे भूमिका मांडली. काही दिवसांपूर्वी शशांकने रस्त्यातील खड्ड्यांवरूनही पोस्ट केली होती. याबाबतही त्याने भाष्य केलं. तो म्हणाला, “मी टॅक्स भरतो. त्यामुळे रस्त्यातील खड्ड्यांमुळे माझ्या गाडीचं टायर पंक्चर झालं, तर मी तुमच्या घरी येऊन पैसे मागू का? समजा, मी माझ्या मुलाला गाडीवरुन घेऊन जातोय. खड्ड्यांमुळे आम्ही दोघेही पडलो. आणि आमच्या अंगावरुन गाडी गेली, तर तुम्ही पैसे देणार आहात का? आमच्यामुळे रस्त्यात खड्डे राहिले, असं तुम्ही भाषणांत म्हणणार आहात का?”
ऐश्वर्याच्या व्हॅनिटीबाहेर दारू पिऊन पडलेला सलमान; ‘देवदास’च्या शूटिंगदरम्यान काय घडलं होतं?
“आपल्या देशात देव, पोलीस आणि राजकारण्यांची भीती घातली गेली आहे. हा सगळ्याच मोठी प्रॉब्लेम आहे. आपल्या काही गोष्टींची आता सवय झालीये. ट्राफिक प्रॉब्लेम, भष्ट्राचार, रस्त्यांची अवस्था हे सगळं असंच चालू राहणार आहे, याबाबत त्यांनी आपलं ब्रेनवॉश केलं आहे. लोकसंख्येमुळे या सोयी तुम्हाला मिळणार नाहीत, हे त्यांनी सांगून टाकलं आहे,” असं म्हणत शशांकने परखडपणे मत मांडलं.
शशांकने मालिकांबरोबरच नाटक व चित्रपटांतही काम केलं आहे. ‘पाहिले न मी तुला’ या मालिकेत तो पहिल्यांदाच खलनायकाच्या भूमिकेत दिसला होता. सध्या तो स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुरांबा’ मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे.