Join us

शशांक केतकरचे झी मराठीवर होणार पुनरागमन, या मालिकेत दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 15:05 IST

होणार सून मी ह्या घरची या मालिकेमुळे तरुणीच्या गळ्यात ताईत बनलेला शशांक आता झी मराठीवरील एका मालिकेत पुन्हा एकदा दिसणार आहे.

ठळक मुद्देपाहिले न मी तुला ही मालिका लवकरच झी मराठी वाहिनीवर सुरू होणार आहे. या मालिकेत शशांक एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसार आहे. या मालिकेत त्याची भूमिका काय असणार याविषयी वाहिनीने आणि मालिकेच्या टीमने मौन राखणेच पसंत केले आहे.

झी मराठीवरील होणार सून मी ह्या घरची या मालिकेतील श्रीच्या भूमिकेतून शशांक केतकर घराघरात पोहचला. या मालिकेला आज इतकी वर्षं झाली असली तरी प्रेक्षकांना त्याची ही भूमिका चांगलीच लक्षात आहे. या मालिकेत तेजश्री प्रधानसोबत त्याची जोडी जमली होती. या मालिकेनंतर त्याने सुखांच्या सरींनी हे मन बावरे,  इथेच टाका तंबू, नकटीच्या लग्नाला यायचं यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले. मालिकेशिवाय तो 31 दिवस, आरॉन, वन वे तिकीट यांसारख्या चित्रपटात झळकला. तसेच पूर्णविराम आणि गोष्ट तशी गंमतीची या नाटकातही त्याने काम केले आहे.

शशांकने अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केले असले तरी त्याला खऱ्या अर्थाने ओळख होणार सून मी ह्या घरची या मालिकेमुळेच मिळाली. या मालिकेमुळे तरुणीच्या गळ्यात ताईत बनलेला शशांक आता झी मराठीवरील एका मालिकेत पुन्हा एकदा दिसणार आहे. पाहिले न मी तुला ही मालिका लवकरच झी मराठी वाहिनीवर सुरू होणार आहे. या मालिकेत शशांक एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसार आहे. या मालिकेत त्याची भूमिका काय असणार याविषयी वाहिनीने आणि मालिकेच्या टीमने मौन राखणेच पसंत केले आहे. त्याची भूमिका काय असणार हे प्रेक्षकांसाठी सरप्राईज असणार आहे. 

शशांकसोबतच या मालिकेत आशय कुलकर्णी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आशयने माझा होशील ना या मालिकेत डॉ. सुयशची भूमिका साकारली होती. त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. तसेच या मालिकेत तन्वी मुंडले हा नवीन चेहरा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 

टॅग्स :शशांक केतकरझी मराठी