Join us  

आईच्या जाचाला कंटाळली होती प्रसिद्ध अभिनेत्री; लहानपणी सख्या माऊलीनेच केले होते लेकीवर अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 1:27 PM

Seema kapoor: सीमा यांच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला होता. ज्यामुळे सीमा यांचा वयाच्या १२ वर्षापर्यंतच सांभाळ त्यांच्या आईने केला.

सीमा कपूर हे नाव आज छोट्या पडद्यावर चांगलंच गाजत आहे. 'बिदाई', 'मधुबाला', 'कुरुक्षेत्र', 'एक हजारों में मेरी बहना हैं', 'हसरते' अशा कितीतरी गाजलेल्या मालिकांमध्ये सीमा यांनी काम केलं आहे. इतकंच नाही तर ९० च्या दशकात त्यांनी अनेक सुपरहिट सिनेमाही दिले आहेत. परंतु, इंडस्ट्रीत नाव कमावणाऱ्या या अभिनेत्रीने खऱ्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. अगदी लहान असतांना बालशोषण, एकटेपणा आणि अशा अनेक समस्यांना त्या सामोऱ्या गेल्या आहेत.

अलिकडेच सीमा यांनी 'दैनिक भास्कर'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी लहानपणी त्यांचं कसं शोषण झालं हे सांगितलं. लहान असतांना त्यांच्या कोवळ्या मनावर झालेल्या आघातामुळे मी लहानपणापासून कमनशिबी असल्याचं त्या या मुलाखतीमध्ये म्हणाल्या.

नेमकं काय घडलं सीमा यांच्यासोबत?

"मी लहानपणासूनच कमनशिबी आहे. लहान असतांनी माझ्यासोबत जे काही इतर मुल होती त्यांच्याकडे पाहून कायम असं वाटायचं की त्यांचे आई-वडील कसे त्यांच्यासोबत कायम खंबीरपणे उभे असतात ना. त्या मुलांना त्यांच्या आई-वडिलांसोबत पाहिल्यावर मला खूप एकटं वाटायचं. माझ्या कुटुंबातलं वातावरण खूप खराब होतं. मी सहा वर्षांची असतांना माझे आई-वडील विभक्त झाले. मी माझ्या आईसोबत रहायचे. ती प्रचंड कडक शिस्तीची होती. ती सतत मला मारायची. मी बालशोषणाची शिकार झाले होते त्यावेळी", असं सीमा म्हणाल्या.

पुढे त्या म्हणतात, "वयाच्या १२ व्या वर्षी मी माझ्या वडिलांकडे रहायला गेले. त्यांचा मला खूप पाठिंबा होता. मला माझ्या वडिलांकडून खूप काही शिकता आलं. आज मला जे काही थोडं फार यश मिळालं आहे. त्या यशामुळेच आज माझ्या अवतीभोवती असलेले लोक माझ्यासोबत आहेत. कधी मी आसपासच्या या परिस्थितीकडे पाहिलं की असं वाटतं आता जगात आले तर जगणं सोडू तर शकत नाही ना. जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत हार मानणार नाही."

प्रेमातही मिळालं अपयश

"वयाच्या १५ व्या वर्षी मी प्रेमात पडले पण तिथेही माझी फसवणूकच झाली. ज्याच्यावर प्रेम केलं तो खोटारडा निघाला. पण, जर त्यावेळी माझ्यासोबत तो प्रसंग घडला नसता तर कदाचित माझं आयुष्य आज काही वेगळच असतं. मी लहानपणापासूनच थोडी Regressive स्वभावाची आहे. त्यावेळी मला खूप टॉर्चर सहन करावं लागलं होतं. माझ्या मनात सतत एकच प्रश्न यायचा माझं आयुष्य हे असं काय आहे. लहानपणी आईने त्रास दिला, प्रेमातही अपयश आलं. या सगळ्यामुळे माझ्या मनात अनेकदा आत्महत्येचे विचार यायचे."

दरम्यान, सीमा कपूर यांनी त्यांच्या खऱ्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. मात्र, या परिस्थितीमध्येही त्यांनी त्यांचं करिअर घडवलं. त्यांनी बॉलिवूडसह पंजाबी फिल्म इंडस्ट्रीमध्येही काम केलं आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारसिनेमाशेखर सुमन