तुनिषा शर्माच्या आईच्या आरोपांवर शिजान खानची बहीण फलक नाज देणार उत्तर, म्हणाली- 'मी लवकरच.....

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2022 11:32 AM2022-12-31T11:32:48+5:302022-12-31T11:33:27+5:30

तुनिषा शर्माच्या आईनं एक्स बॉयफ्रेंड शिजान खान आणि त्याच्या कुटुंबावर पत्रकार परिषद घेऊन अनेक गंभीर आरोप केले.

Sheezan mohammed khan sister falaq naaz will respond soon tunisha sharma mother vanita sharma allegations on her family | तुनिषा शर्माच्या आईच्या आरोपांवर शिजान खानची बहीण फलक नाज देणार उत्तर, म्हणाली- 'मी लवकरच.....

तुनिषा शर्माच्या आईच्या आरोपांवर शिजान खानची बहीण फलक नाज देणार उत्तर, म्हणाली- 'मी लवकरच.....

googlenewsNext

Falaq Naaz On Tunisha Sharma Suicide Case: छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरण सध्या चर्चेत आहे. शुक्रवारी तुनिषा शर्माची आई वनिता शर्मा यांनी पत्रकार परिषदेत अभिनेत्रीचा एक्स बॉयफ्रेंड शिजान मोहम्मद खान आणि त्याच्या कुटुंबावर अनेक गंभीर आरोप केले. शिजान खानची बहीण आणि प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री फलक नाज लवकरच तुनिषा शर्माच्या आईच्या या आरोपांना उत्तर देताना दिसणार आहे.

या प्रकरणाच्या सुरुवातीपासून तुनिषा शर्माची आई शिजान खान आणि त्याच्या कुटुंबावर अनेक आरोप करत आहे. तुनिषाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी शिजान खानला यापूर्वीच अटक केली आहे. शुक्रवारी, 30 डिसेंबर रोजी, तुनिषा शर्माची आई वनिता शर्मा यांनी पत्रकार परिषद घेतली आणि शिजान आणि तिच्या कुटुंबावर पुन्हा एकदा आरोप केले.

यानंतर शीझान खानची बहीण फलक नाज हिने एएनआय  सांगितले की, 'मी लवकरच आमच्यावर केलेल्या (तुनिषाच्या आई) आरोप आणि प्रश्नांची पत्रकार परिषद घेऊन उत्तर देईन. सध्या आमचे पहिले टार्गेट म्हणजे आमचा भाऊ (शिजान खान) आहे. जो सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. 

शिजान खान करत नाहीये तपासात सहकार्य 
कोर्टात पोलिसांनी सांगितले की, शिजान खान तपासात पूर्ण सहकार्य करत नाही. अभिनेत्याच्या व्हॉट्सअ‍ॅपवरून अनेक चॅट्स डिलीट करण्यात आल्या आहेत, पण शिजान त्याबद्दल काहीही सांगत नाही. पोलिसांनी सांगितले की, काही हटवलेल्या चॅट तुनिषा शर्मासोबतही होत्या, अशा परिस्थितीत ते त्यांच्या तपासात गुंतले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिजानच्या काही चॅट त्याच्या 'सिक्रेट गर्लफ्रेंड'सोबतही झाल्या आहेत. यासोबतच तुनिषा शर्माच्या मोबाईलमध्ये जे काही चॅट सापडले आहेत, त्याची चौकशी अजून व्हायची आहे.

शिजानने तुनिषा शर्माला मारली होती थप्पड 
तुनिषा शर्माच्या आईने शीजनवर आरोप केला आहे की अभिनेत्याने तिच्या मुलीला थप्पड मारली. एवढेच नाही तर शीजानचे कुटुंब तुनिशाला ब्लॅकमेल करायचे, तसेच तिला उर्दू शिकवायचे. अशा स्थितीत पोलिस या अँगलनेही तपास करतील, असे मानले जात आहे.

Web Title: Sheezan mohammed khan sister falaq naaz will respond soon tunisha sharma mother vanita sharma allegations on her family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.