पंजाबची कतरिना म्हणजेच शहनाज गिल (Shehnaaz Gill)ला नुकतेच लोकमत डिजिटल क्रिएटर अवॉर्ड २०२३ (Lokmat Digital Creator Awards 2023) सोहळ्यात लोकमत डिजिटल पर्सनॅलिटी ऑफ द इयरच्या अवॉर्डनं सन्मानित करण्यात आला. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी स्टेजवर आलेल्या शहनाजला गाणं गाण्याची विनंती करण्यात आली. या दरम्यानचा शहनाज गिलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून लोक पुन्हा एकदा तिचं कौतुक करताना थकत नाहीत.
शहनाज अवॉर्ड स्वीकारायला आली असताना तिला गाण्यासाठी विनंती करण्यात आली. अभिनेत्रीनं पंजाबी गाणं गायला सुरुवात केली आणि तितक्यात अजान सुरू झाली. यानंतर शहनाजने लगेच गाणे थांबवले आणि मान खाली घातली. सर्व धर्मांबद्दलचा आदर पाहून शहनाजचे सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे. शहनाजच्या या व्हिडिओची इंटरनेटवर खूप चर्चा होत आहे. नेटिझन्स म्हणतात की, अभिनेत्रीला प्रत्येक धर्माचा आदर करणं चांगलंच माहीत आहे.
व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, 'म्हणूनच लोक तिच्यावर प्रेम आणि तिचा आदर करतात', तर दुसऱ्या यूजरने लिहिले की, 'प्रत्येकाने शहनाजसारखं असायला हवं. आम्हाला तुझा अभिमान आहे.'
शहनाजे डिजिटल पर्सनॅलिटी ऑफ द इयरचा अवॉर्ड दिल्याबद्दल लोकमतचे आभार मानलं. तसेच ती म्हणाली, माझे श्वास चालू आहेत, तोपर्यंत मी प्रेक्षकांचे मनोरंजन करत राहीन. शहनाज गिल अनेक वर्षांपासून पंजाबी इंडस्ट्रीत कार्यरत आहे. पण तिला खरी ओळख बिग बॉस १३ मधून मिळाली ज्यामध्ये ती एक स्पर्धक म्हणून सहभाही झाली होती. या शोमधून तिला खूप लोकप्रियता मिळाली होती. तिने अद्याप बॉलिवूडमध्ये पदार्पण केले नसले, तरी तिची लोकप्रियता एखाद्या मोठ्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. ती सोशल मीडियावर सक्रीय असून तिच्या 'तौडा कुत्ता टॉमी, सादा कुत्ता कुत्ता' या गाण्याला सोशल मीडियावर खूप पसंती मिळाली होती. नेटिझन्स तिच्या सोशल मीडिया पोस्ट्सवर प्रेम करतात. इंस्टाग्रामवर तिचे १४ मिलियनहून जास्त फॉलोवर्स आहेत.