काल गुरुवारी अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे (Sidharth Shukla) हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले. त्याच्या मृत्यूच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला. अख्खी इंडस्ट्री हळहळली, चाहते गहिवरले. कुटुंबीयांच्या दु:खाला तर पारावर उरलेला नाही आणि शहनाज गिलची (Shehnaz Gill) अवस्था तर बघवत नाही. सिद्धार्थच्या मृत्यूनंतर पहिल्यांदा शहनाजचे फोटो समोर आले आणि तिला पाहणारा प्रत्येक जण हळहळला.
अवघ्या 40 व्या वर्षी जगाचा निरोप घेणा-या सिद्धार्थचे पार्थिव घरी काहीच वेळापासून रूग्णालयातून घरी आणण्यात आले. थोड्याच वेळात ओशिवरा स्मशानभूमीत सिद्धार्थवर अंत्यसंस्कार होतील. त्याआधी अनेक सेलिब्रिटी त्याच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी त्याच्या घरी पोहोचले.
अनेकांनी ओशिवरा स्मशानभूमीकडे रवाना झालेत. सिद्धार्थची अतिशय जवळची मैत्रिण शहनाज गिल ही सुद्धा आपल्या लाडक्या मित्राला अंतिम निरोप देण्यासाठी स्मशानभूमीत पोहोचली. पण यावेळी तिची अवस्था पाहून प्रत्येकाला अश्रू अनावर झाले.
सिद्धार्थच्या मृत्यूची बातमी मिळाल्यापासून तिच्या डोळ्यातील अश्रू थांबता थांबत नाहीयेत. स्वत:ला सावरणेही तिला कठीण जातेय. कारमध्येही शहनाज रडत होती. तिला कसलीही शुद्ध नव्हती. पोलीस बंदोबस्तात शहनाज स्मशानभूमीत दाखल झाली. पण तिच्या डोळ्यांतून अखंड अश्रूधारा वाहत होत्या.
सिद्धार्थच्या मृत्युनंतर शेहनाझला मोठा धक्का बसला आहे. मीडिया अहवालानुसार त्याने प्राण सोडला त्यावेळी शहनाज तिथेच उपस्थित होती.ई-टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, बुधवारी रात्री 9.30 वाजता सिद्धार्थ घरी आला आणि त्याला अस्वस्थ वाटू लागले. त्यावेळी त्याच्या घरी त्याची आई व शहनाज दोघीही हजर होत्या. आधी त्यांनी सिद्धार्थना नींबू शरबत दिले आणि नंतर आईसक्रीम खायला दिली. जेणेकरून सिद्धार्थला थोडे बरे वाटावे. पण सिद्धार्थची अस्वस्थता वाढत गेली. त्याला पुन्हा छातीत दुखू लागले. शहनाज व त्याच्या आईने त्याला विश्रांती करायचा सल्ला दिला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थला झोपू शकला नाही. त्याने शहनाज त्याच्या जवळ राहून पाठ थोपटायला सांगितली. रात्री 1.30 च्या सुमारास सिद्धार्थ शहनाजच्या कुशीतच झोपला. शहनाजचाही डोळा लागला होता. सकाळी 7 वाजता शहनाजची झोप उघडली तेव्हा सिद्धार्थ रात्रभर एकाच पोझिशनमध्ये असल्याचे आणि तो काहीही हालचाल करत नसल्याचे तिला जाणवले. तिने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. पण त्याने काहीही प्रतिसाद दिला नाही. ती घाबरली आणि ओरडत 15 व्या माळ्यावर 5 व्या माळ्यावर आली. जिथे त्याची फॅमिली राहत होती. सिद्धार्थची बहिण धावत वर आली. त्यांनी फॅमिली डॉक्टरला बोलवले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.