Join us

आणि शिल्पा शेट्टीला बसला आश्चर्याचा धक्का दिला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2019 9:30 AM

सुपर डान्सर पर्व 3 मधील सर्व स्पर्धकांचे वडील हे शिल्पाचे चाहते आहेत. त्यापैकीच एक आहेत, गौरवचे वडील, जे प्रत्येक आठवड्याला शिल्पासाठी आवर्जून काही तरी विशेष करतात.

ठळक मुद्देशिल्पाने सुपर डान्सर 3च्या स्टेजवर तिची आवडती मिळाई खाल्ली

आपणा सर्वांना हे माहीत आहे की, शिल्पा शेट्टीला फिटनेसचे वेड आहे आणि ती नियमितपणे आरोग्यप्रद, संतुलित आहार घेते. रविवारी मात्र ती अन्नावर ताव मारते व त्या दिवशी स्वतःची आवडती डेझर्ट आणि आपल्या आहारात अतिरिक्त कॅलरींचा समावेश करते. पण फिटनेसचा आदर्श असलेल्या आणि आहाराच्या बाबतीत काटेकोर असलेली शिल्पा शेट्टी सुपर डान्सर 3 च्या एका भागात थोडी विचलित झालेली दिसली. ती गोडखाऊ आहे आणि त्या दिवशी सेटवर तिने आपली आवडती मिठाई खाल्ली.

 

 यात काही गुपित नाही, की सुपर डान्सर पर्व 3 मधील सर्व स्पर्धकांचे वडील हे शिल्पाचे चाहते आहेत. त्यापैकीच एक आहेत, गौरवचे वडील, जे प्रत्येक आठवड्याला शिल्पासाठी आवर्जून काही तरी विशेष करतात आणि यावेळी त्यांनी तिच्यासोबत सेटवर मस्त कॅन्डल लाइट डिनरचे आयोजन केले. गौरव या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी थेट जयपूरहून आला आहे आणि त्याच्यासोबत नेहमी त्याचे वडील असतात. हा संपूर्ण अनुभव गौरवच्या वडिलांसाठी अगदी नवीन असला तरी आपल्या आवडत्या तारिकेसोबतचे हे खास क्षण त्यांना आनंद देऊन गेले. या डेटसाठी ते छान कपडे घालून तयार झाले होते आणि ते शिल्पाला मंचाकडे घेऊन गेले, ज्या ठिकाणी ही सर्व तयारी करण्यात आली होती. 

 

शिल्पा शेट्टीने खुर्चीत बसल्यानंतर जेव्हा जेवायला काय आहे ते पाहिले तेव्हा ती खुशीत येऊन हसली आणि म्हणाली, “अरे देवा, हे तर झांमाचे गुलाब जाम! ते जगातले सर्वोत्तम गुलाब जाम असतात. मी फक्त त्याचा वास घेऊन हे सांगू शकते की, ते झांमाचे गुलाब जामून आहेत.” झांमा स्वीट्स हे मिठाईचे दुकान आहे, ज्याच्या अनेक शाखा आहेत व त्यातील एक चेंबुरला आहे. शिल्पा शेट्टी पूर्वी चेंबुरमध्ये राहायची, त्यावेळी तिला तिचे आवडते गुलाब जामून तेथे मिळायचे. झांमा हे विशेषतः त्यांच्या गुलाब जामसाठीच प्रसिद्ध आहे, आणि बिग बी, अमिताभ बच्चन सहित अनेक मान्यवर व्यक्ती हे गुलाब जामून सर्वोत्तम असल्याचे मानतात. गुलाब जामून आणल्यानंतर शिल्पाने ‘ना ना करते प्यार’ या गाण्यावर गौरवच्या वडिलांबरोबर नृत्य केले. त्या दिवशी सर्वांना उत्कृष्ट गुलाम जाम चाखायला मिळाले, ज्याचे श्रेय गौरवच्या वडिलांना जाते.

टॅग्स :शिल्पा शेट्टीसुपर डान्सर