शिल्पा शेट्टी खुश्श! मिळाला आणखी एक मोठा रिअ‍ॅलिटी शो, शेअर केला प्रोमो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 10:31 AM2021-09-22T10:31:45+5:302021-09-22T10:33:51+5:30

शिल्पा शेट्टीच्याआयुष्यातलं एक एक वादळ आताश: काहीसे शांत होतांना दिसतेय. शिल्पाचा पती राज कुंद्रा काल तुरूंगातून बाहेर आला. वर्कफ्रंटवरही तिच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

Shilpa Shetty Joins India's Got Talent As A Judge | शिल्पा शेट्टी खुश्श! मिळाला आणखी एक मोठा रिअ‍ॅलिटी शो, शेअर केला प्रोमो

शिल्पा शेट्टी खुश्श! मिळाला आणखी एक मोठा रिअ‍ॅलिटी शो, शेअर केला प्रोमो

googlenewsNext
ठळक मुद्दे‘इंडियाज् गॉट टॅलेंट’ हा शो ‘गॉट टॅलेंट’ या ब्रिटीश शोवर आधारित आहे. 2009 मध्ये  ‘इंडियाज् गॉट टॅलेंट’ लॉन्च झाला होता.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या (Shilpa Shetty) आयुष्यातलं एक एक वादळ आताश: काहीसे शांत होतांना दिसतेय. शिल्पाचा पती बिझनेसमन राज कुंद्राला गेल्या जुलै महिन्यात पोर्नोग्राफी प्रकरणात अटक झाली होती. तेव्हापासून तो तुरूंगात होता. अखेर 62 दिवसानंतर त्याला परवा जामीन मंजूर झाला. काल तो तुरूंगातून बाहेर आला. शिल्पासाठी हा मोठा दिलासा आहे. वर्कफ्रंटवरही तिच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. शिल्पा सध्या ‘सुपर डान्सर चॅप्टर 4’ हा डान्स रिअ‍ॅलिटी शो जज करतेय. आता ती आणखी असाच एक मोठा रिअ‍ॅलिटी शो जज करताना दिसणार आहे. होय, ‘इंडियाज् गॉट टॅलेंट’ ( India's Got Talent ) हा शो शिल्पा जज करणार आहे. तिने याचा प्रोमो व्हिडीओही शेअर केला आहे.

‘सुपर डान्सर चॅप्टर 4’ संपल्यानंतर शिल्पा ‘इंडियाज् गॉट टॅलेंट’चा 9 वा सीझन जज करेल. लवकरच या शोचे आॅडिशन सुरू होणार आहे. या शोमध्ये   देशभरातील अनेक लोक येऊन त्यांच्यात असलेले कलागुण प्रेक्षकांसमोर सादर करताना दिसतील.  
 ‘इंडियाज् गॉट टॅलेंट’ हा शो ‘गॉट टॅलेंट’ या ब्रिटीश शोवर आधारित आहे. 2009 मध्ये  ‘इंडियाज् गॉट टॅलेंट’ लॉन्च झाला होता. या शोचा पहिला सीझन किरण खेर, सोनाली बेंद्रे व शेखर कपूर यांनी जज केला होता. किरण खेर तेव्हापासून हा शो जज करत आहेत. पण प्रकृती कारणास्तव आता त्या नव्या सीझनमध्ये दिसणार नाहीत.
 ‘इंडियाज् गॉट टॅलेंट’मध्ये आत्तापर्यंत अनेकांनी जजची भूमिका बजावली. धर्मेंद्र, साजिद खान, फराह खान, करण जोहर, मलायका अरोरा अशा अनेकांना प्रेक्षकांनी जज म्हणून पाहिले आहे.


 

Web Title: Shilpa Shetty Joins India's Got Talent As A Judge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.