Join us

​शिल्पा शेट्टी अशी ठेवते राज कुंद्रावर नजर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2018 6:18 AM

शिल्पा शेट्टी सध्या सुपर डान्सर या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका साकारत आहे. या कार्यक्रमाचे आजवरचे सगळेच सिझन गाजले आहेत. या ...

शिल्पा शेट्टी सध्या सुपर डान्सर या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका साकारत आहे. या कार्यक्रमाचे आजवरचे सगळेच सिझन गाजले आहेत. या कार्यक्रमांच्या यंदाच्या सिझनला देखील प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळत आहे. या सिझनमधील चिमुकले स्पर्धक एकाहून एक सरस परफॉर्मन्स सादर करत आहेत. त्यामुळे कोणता स्पर्धक या कार्यक्रमात बाजी मारणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागलेली आहे. या कार्यक्रमात शिल्पा शेट्टीसोबत गीता कपूर आणि अनुराग बासू परीक्षकाची भूमिका साकारत आहेत. या कार्यक्रमातील आकाश थापा हा खूपच चांगला डान्सर आहे. पण त्याचसोबत तो खूप नॉटी देखील आहे आणि त्यामुळे त्याला नॉटी थापा असेच म्हटले जाते. या नॉटी थापावर अनुराग बासूने एक जबाबदारी सोपवली आहे. अनुरागने त्याला सांगितले आहे की, दर आठवड्याला त्याने काहीतरी धमाल मस्ती करायची, कोणाची तरी खोटी काढायची. अनुराग बासू यामुळे प्रभावित झाल्यास तो त्याला एक भेटवस्तू देईल. या आठवड्यात त्याने आपला एक सहस्पर्धक बिशाल शर्मा आणि त्याचे वडील यांचे एक गुपित सगळ्यांना सांगितले. त्याने सांगितले, बिशाल शर्माची आई दर तासाला आपल्या पतीला फोन करते. कारण तिला सतत आपल्या मुलाची काळजी वाटत असते. तो व्यवस्थित आहे ना, तसेच तो व्यवस्थित खात-पित आहे ना हे तिला जाणून घ्यायचे असते. पण हे सगळे ऐकल्यावर शिल्पा शेट्टी गंमतीने म्हणाली की, बिशालची आई बिशालवर नव्हे तर फोन करून त्याच्या वडिलांवर लक्ष ठेवते. यावर गीता कपूरने सांगितले की, याच कारणामुळे राज कुंद्रा कुठे आहे हे जाणून घेण्यासाठी शिल्पा सतत वियानला फोन करते आणि वियानदेखील वडिलांच्या शेड्यूलमध्ये काही बदल झाला तर ते लगेचच शिल्पाला कळवतो.पती-पत्नीचे नाते कसे खुमासदार असते, हेच उघड करणारी ही गुपिते होती. शिल्पा आपल्या पतीवर नजर ठेवते हे गीता कपूरने उघड केल्यानंतर शिल्पाने संगितले की, तसे करताना तिला काही संकोच वाटत नाही कारण त्या दोघांचेही शेड्यूल खूप धावपळीचे असते.Also Read : शिल्पा शेट्टीने मागितली माफी; पण सलमान खानचे काय?