Join us

नवऱ्यानंतर आजही महिलांना स्वतःच्या हक्कासाठी लढावं लागतं', थेट नॅशनल टीव्हीवर व्यक्त झाली शिल्पा शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2021 1:23 PM

राज कुंद्राला अटक झाल्यानतर शिल्पा शेट्टी सुपर डान्सर ४ या शोमधून काही दिवस ब्रेक घेतला होता. शोमध्ये शिल्पा पुन्हा परतणार नसल्याचेही म्हटले जात होते.

पॉर्नोग्राफी प्रकरणावरून राज कुंद्राला अटक करण्यात आल्यानंतर शिल्पा शेट्टीही अडचणीत येणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. कुठे ना कुठे शिल्पालाही पतीच्या अटकेमुळे मनस्ताप सहन करावा लागला होता. या प्रकरणामुळे शिल्पाचीही बदनामी झाली. शेवटी तिने पोस्ट शेअर करत सोशल मीडियावर आपले मत मांडले होते. यानंतर आता थेट नॅशनल टीव्हीवरच तिने पुन्हा एकदा मनातली खंत बोलून दाखवली आहे.

राज कुंद्राला अटक झाल्यानतर शिल्पा शेट्टीने  'सुपर डान्सर ४' या शोमधून काही दिवस ब्रेक घेतला होता. शोमध्ये शिल्पा पुन्हा परतणार नसल्याचेही म्हटले जात होते. शोमध्ये शिल्पा शेट्टी दिसत नसल्यामुळे चाहतेही तिला मिस करत होते. काही दिवसांपूर्वीच ती पुन्हा परतली आहे.

सकारात्मक उर्जेसह ती पुन्हा एकदा शोमध्ये झळकत आहे. शोच्या सेटवर पहिल्याच दिवशी तिचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. शिल्पा शेट्टीलाही तिचे झालेले स्वागत पाहून अश्रु रोखणे कठीण जात होते. पुन्हा एकदा ती स्पर्धकांना जज करताना दिसत आहे. ''सुपर से भी उपर'' पुन्हा एकदा शिल्पाचा हा प्रसिद्ध डॉयलॉग ऐकून चाहत्यांनाही आनंद झाला असावा. 

नुकत्याच झालेल्या भागात स्पर्धकाने झाशीच्या राणीच्या संकल्पनेवर डान्स केला होता. परफॉर्मन्स पाहिल्यानंतर शिल्पा शेट्टीने स्पर्धकाचे कौतुक करताना  भावूक झाली.यावेळी ती म्हणला की, आजही पतीच्या पश्चात महिलांना त्यांच्या हक्कासाठी लढावं लागतं. स्वतःच्या अस्तित्वासाठी आणि मुलांसाठी संघर्ष करावा लागतो.आजही झाशीची राणी प्रत्येक महिलेसाठी संघर्ष करण्याची प्रेरणा देते. 

तसेच रक्षांबधनचा उत्साही यावेळी पाहायला मिळाला. गीता माँने शिल्पाला राखी बांधत सदैव तिला साथ देत राहणार असे वचन दिले तर, शिल्पानेही गीता माँला राखी बांधत गीता माझी कधीच साथ सोडणार नाही असा विश्वास असल्याचे सांगितले. गीता माँ आणि शिल्पा शेट्टी यांच्यामध्ये असलेले बॉन्डींग पुन्हा एकदा दिसून आले. एकुणच काय तर शिल्पाचे शोमध्ये परतण्याने पुन्हा एकदा वेगळीच रंगत पाहायला मिळत आहे हे मात्र नक्की. 

टॅग्स :शिल्पा शेट्टी