Join us

शिल्पा शिंदेचा आरोप, संजय कोहलीने केली सेक्सची डिमांड; तर संजयच्या पत्नीने केला शिल्पावर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2017 3:20 PM

‘भाबीजी घर पर है’ या मालिकेतून अंगुरी भाभी म्हणून प्रसिद्धी झोतात आलेल्या शिल्पा शिंदे हिने निर्माता संजय कोहली याच्यावर ...

‘भाबीजी घर पर है’ या मालिकेतून अंगुरी भाभी म्हणून प्रसिद्धी झोतात आलेल्या शिल्पा शिंदे हिने निर्माता संजय कोहली याच्यावर सेक्शुअल हॅरेसमेंटचा आरोप केला आहे. शिल्पाच्या मते, संजयने तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला असून, सेक्सची डिमांड केली होती. परंतु शिल्पाच्या या आरोपांना आता संजयची पत्नी बिनॅफर कोहली हिने जशास तसे उत्तर दिले आहे. तिने शिल्पाच्या आरोपांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना म्हटले की, तिने बिनबुडाचे आरोप करणे थांबवावे.बिनॅफरने म्हटले की, संजय आणि मी शिल्पाने केलेले आरोप ऐकून शॉक्ड झाली. जर संजयने शिल्पाला सेक्शुअली हॅरेश केले असेल तर तिने याअगोदरच याविषयी का वाच्यता केली नाही? तिला हा शो सोडून आता एक वर्ष होते, त्यादरम्यान तिने शंभरपेक्षा अधिक इंटरव्ह्यू दिलेत शिवाय फेमिनिझमबदलही जाहीरपणे बोलली, मग त्याचवेळी सेक्शुअल हॅरेसमेंटचा मुद्दा का उपस्थित केला नाही. मला अपेक्षा आहे की, शिल्पाने केलेले आरोप हे पूर्णत: निराधार असून, ते कधीच सिद्ध होणार नाहीत, तर शिल्पाला जेव्हा याविषयी विचारण्यात आले तेव्हा ती तिच्या आरोपांवर ठाम होती. संजय कोहली - पत्नी बिनॅफर कोहलीगेल्या शुक्रवारी शिल्पाने संजय कोहली याच्यावर सेक्शुअल हॅरेसमेंटचे आरोप करताना एफआयआर दाखल केली होती. यात तिने आरोपांबाबत तपशिलवार सांगितले होते. शिल्पाच्या मते, कोहली तिला सातत्याने ब्लॅकमेल करीत होता. जर तिला शोमध्ये कायम राहायचे असेल तर तिला त्याच्याबरोबर लैंगिक संबंध प्रस्थापित करावे लागतील. संजय माझा नेहमीच उपभोग घेण्याचा प्रयत्न करीत होता. तो माझ्याशी बोलताना बºयाचदा आपत्तीजनक शब्दांचा वापर करीत होता. शिवाय एकदा त्याने मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचाही प्रयत्न केला होता. त्यावेळी मी त्याला सुनावले होते. तेव्हा संजयने मला धमकी दिली होती की, याबाबत कुठेही वाच्यता केली तर तुला शोमध्ये ठेवणार नाही. शिल्पाने असेही म्हटले की, या घटनेच्या दुसºयाच दिवशी संजय मेकअप रूममध्ये आला होता. त्याने पुन्हा माझ्याकडे सेक्सची डिमांड केली होती. त्यावेळी माझा मेकअप मॅन उपस्थित असल्याचेही शिल्पाने सांगितले. दरम्यान, आता या प्रकरणात संजयची पत्नी बिनॅफर हिने उडी घेतल्याने या प्रकरणाला वेगळेच वळण मिळण्याची शक्यता आहे. आता पोलीस कशा पद्धतीने या प्रकरणाकडे बघतात, त्यांच्या तपासाची सूत्रे काय असतील हे बघणे मजेशीर ठरेल. ALSO READ : शिल्पा शिंदेने भाभीजी घर पर है निर्माते संजय कोहली विरुद्ध केली लैंगिक अत्याचाराची तक्रार